शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

ममता कुलकर्णीच्या संपत्तीची होणार चौकशी

By admin | Updated: July 12, 2016 03:54 IST

इफेड्रीन तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रगमाफिया विकी गोस्वामी याची बहीण रिटा गोस्वामी (रा. अहमदाबाद) हिला केवळ मैत्रीखातर दोन कोटींची रक्कम दिल्यामुळे अभिनेत्री

जितेंद्र कालेकर,  ठाणेइफेड्रीन तस्करी प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रगमाफिया विकी गोस्वामी याची बहीण रिटा गोस्वामी (रा. अहमदाबाद) हिला केवळ मैत्रीखातर दोन कोटींची रक्कम दिल्यामुळे अभिनेत्री ममता कुलकर्णी चांगलीच अडचणीत आली आहे. आता हे दोन कोटी केवळ मैत्रीखातर तिने आपल्याला दिल्याचा दावा रिटाने केला असला तरी ममता आणि रिटा यांनी याबाबत आयकर खात्याला कळवले का? त्याबाबतचा योग्य तो कर भरला आहे का? याचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.गेल्याच आठवड्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमलीपदार्थविरोधी पथकाचे सहायक पोलीस आयुक्त भरत शेळके आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम शेळके यांच्या पथकाने रिटा आणि तिचा मुलगा दिग्विजय यांची कसून चौकशी केली. त्या वेळी तिने पोलिसांना अत्यंत सावधपणे उत्तरे देऊन अनेक प्रश्नांना बगल दिली. अर्थात, आपल्याला बांधकाम व्यवसायासाठी ममताने मैत्रीखातर दोन कोटी रुपये दिल्याची कबुली मात्र तिने दिली. यासंदर्भात तिने आयकर भरणा केला आहे की नाही? तसेच याबाबतची माहिती आयकर विभागाला दिली आहे का? अशा अनेक बाबींची पडताळणी आयकर विभागामार्फत केली जाणार आहे. तर, ममताच्या अंधेरी येथील कार्यालयातून मिळालेल्या पासपोर्ट क्रमांकाच्या आधारे तिचे पॅनकार्डही ठाणे पोलिसांना मिळाले. रिटाशी केलेल्या व्यवहाराची (दोन कोटी) माहिती तिने आयकर विभागाला दिली आहे का? तिचा टीडीएस कापला गेला आहे का? अशा अनेक बाबींची माहिती ही मुंबईच्या मुख्य आयकर विभागातून घेतली जात आहे. तिने जर आयकर भरणा केला असेल, तर त्यात रिटाला दिलेल्या रकमेचा उल्लेख आहे का? नसेल तर या प्रकाराची माहिती आयकर विभागाला मिळाल्यानंतर त्यांच्याकडूनही या दोघींची स्वतंत्रपणे चौकशी होऊ शकते, अशीही माहिती या अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला दिली.