शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

ममता कुलकर्णीची पुन्हा चौकशी

By admin | Updated: May 8, 2016 02:29 IST

सोलापूरमध्ये अमली पदार्थांच्या कंपनीवर छापा टाकल्यानंतर चौकशीत दररोज नवी माहिती हाती लागत असून ड्रगमाफिया विकी गोस्वामीचे व्यवहार तपासण्यासाठी त्याची कथित पत्नी अभिनेत्री

- जितेंद्र कालेकर,  ठाणे

सोलापूरमध्ये अमली पदार्थांच्या कंपनीवर छापा टाकल्यानंतर चौकशीत दररोज नवी माहिती हाती लागत असून ड्रगमाफिया विकी गोस्वामीचे व्यवहार तपासण्यासाठी त्याची कथित पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णीच्या वर्सोवा येथील घरी जाऊन गरज पडल्यास पुन्हा चौकशी केली जाणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांनी दिली. प्रकरणाच्या चौकशीसाठी एकूण सात पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापुरातील एव्हॉन लाइफ सायन्सेस कंपनीतून पुनीत श्रींगी यानेच इफेड्रीनचा माल बाहेर काढल्याची माहिती कंपनीतील सात व्यवस्थापकांनी चौकशीत पोलिसांना दिली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने एव्हॉनमधील सहा व्यवस्थापकांची चौकशी केली. त्यात कंपनीचे संचालक मनोज जैन यांनी पुनीतची सल्लागार म्हणून नियुक्ती केल्यानंतर बरेचसे इफेड्रीन बाहेर काढल्याची माहिती दिली. तो कोणत्याही वेळी कारमधून माल घेऊन जात होता. किशोर राठोड आणि जयमुखीमार्फत देशविदेशांत माल जात होता. किशोरमार्फत विकीपर्यंत माल गेल्याचे उघड झाली आहे. या संपूर्ण प्रकरणात किशोर आणि जयमुखींचा मोठा सहभाग असल्याचे उघड झाल्याने त्यांच्या शोधासाठी ठाणे पोलिसांनी सात पथकांची नियुक्ती केली आहे. सोलापूरमधूनच अहमदाबाद, इंदूर आणि ठाण्यातही माल गेल्याचे उघड झाले आहे. या तिन्ही ठिकाणच्या मालाच्या पडताळणीनंतर हे स्पष्ट झाले.चौकशीसाठी ठाण्यातममता कुलकर्णीचा या प्रकरणाशी कितपत संबंध आहे, यासाठी पोलीस तिच्या घरी गेले होते. तेव्हा तिची भेट झाली नव्हती. आता गरज पडल्यास पुन्हा चौकशीसाठी ठाणे पोलीस मुंबईत जातील किंवा तिला चौकशीसाठी ठाण्यात बोलवतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.