शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ममता कुलकर्णी आरोपी क्र.१४

By admin | Updated: June 22, 2016 04:13 IST

सोलापूरच्या एव्हॉन लाईफसायन्सेस लि. या कंपनीतून देश विदेशात झालेल्या इफे ड्रीन तस्करीप्रकरणात एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीची ठाणे पोलिसांनी आरोपी क्रमांक १४ अशी नोंद केली आहे

ठाणे : सोलापूरच्या एव्हॉन लाईफसायन्सेस लि. या कंपनीतून देश विदेशात झालेल्या इफे ड्रीन तस्करीप्रकरणात एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री ममता कुलकर्णीची ठाणे पोलिसांनी आरोपी क्रमांक १४ अशी नोंद केली आहे. केनियात झालेल्या इफे ड्रीनच्या तस्करीत तिने चांगली ‘भूमिका’ बजावल्यामुळे तिला एव्हॉनचे संचालक किंवा व्यवस्थापकपदही बहाल केले जाणार होते, अशी माहिती या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांना मिळाली.ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहाजवळ दोन महिन्यांपूर्वी सागर पोवळे आणि मयूर सुखदरे या दोघांना इफे ड्रीनच्या तस्करी प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्यांच्याकडील माहितीतूनच एव्हॉनचा संचालक मनोज जैन, व्यवस्थापक पुनित श्रींगी, नरेंद्र कांचा आदी दहा जणांना पोलिसांनी वेगवेगळया भागातून अटक केली. तर एव्हॉनमधून अडीच हजार कोटींचा सुमारे २३ टन इफे ड्रीन आणि सुडोइफे ड्रीनचा साठाही पोलिसांनी हस्तगत केला. याच प्रकरणात आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी आणि त्याची कथित पत्नी अभिनेत्री कुलकर्णी यांचीही नावे तपासात उघड झाली. यात सध्या ममता, विकी, सुशिल सुब्रमण्यम आणि तांजानियातील रहिवाशी डॉ. अब्दुल्ला या चौघे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)एव्हॉनमधील इफे ड्रीनची केनियासह इतर देशांमध्येही तस्करी करण्यासाठी ममता, मनोज जैन, जयमुखी किशोर राठोड आणि विकी गोस्वामी यांच्यात वारंवार केनियामध्ये बैठका झाल्या. या बैठकांचे सबळ पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. ममताच्या ओशिवारा येथील दोन्ही सदनिकांच्या मेन्टनन्सचे पैसेही विकीकडून दिले जात होते. ८ जानेवारी २०१६ मध्ये केनियात झालेल्या बैठकीतही ममता होती. इफे ड्रीनच्या तस्करीपोटी हवालाद्वारे ममता, विकी, जयमुखी आणि जैन यांना करोडो रुपये मिळाल्याचे सबळ पुरावेही हाती लागल्याची माहिती पोलिसांनी दिली. १ममता आणि तिचा कथित पती विकी हे केनियात असण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. केनिया आणि भारत यांच्यात आरोपी प्रत्यार्पणाचा करार नाही. मात्र, रेड कॉर्नर नोटीस बजावल्यानंतर त्यांना कोणत्याही देशातून इतरत्र पळ काढता येणार नाही. २कोणत्याही देशाच्या विमानतळावर ते आले तर इंटरपोलमार्फत त्यांची माहिती ठाणे आणि अमेरिकेच्या पोलिसांना मिळू शकणार आहे. त्यादृष्टीने आता ही रेड कॉर्नर नोटीस बजावण्याची कार्यवाही सुरु केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त बी. के. शेळके यांनी ‘लोकमत’ ला दिली.