कोल्हापूर : लाच स्वीकारल्याच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या महापौर तृप्ती माळवी यांना पदावरून काढून टाकण्यात यावे, अशा मागणीचा ठराव सोमवारी किंवा मंगळवारी राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे माळवी यांना महापौर पदावरून पायउतार करण्याचा विषय राज्य सरकारच्या अखत्यारित जाऊन पोहोचेल. महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सभेत उपस्थित सर्वच ७२ नगरसेवकांनी महापौरांविरुद्ध मांडलेल्या ठरावाच्या बाजूने मतदान केले होते. या सभेचा वृत्तांत सोमवारी किंवा मंगळवारी तयार होऊन त्याच दिवशी हा ठराव राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)माझ्याविरुद्ध झालेला ठराव मीच सरकारकडे पाठविणार आहे. कारण माझ्यावर केवळ आरोप झाला आहे. मी प्रत्यक्ष गुन्ह्यात सहभागी नाही. आरोप झाला म्हणजे गुन्हा सिद्ध झाला, असा होत नाही. आता यापुढे राज्य सरकारशी हा विषय संबंधित आहे. सरकारने काय तो निर्णय घ्यावा़- तृप्ती माळवी, महापौर
माळवींचा निर्णय शासनदरबारी
By admin | Updated: March 23, 2015 01:14 IST