शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

मालवणीतील दारूकांडाचे ९० बळी !

By admin | Updated: June 21, 2015 03:20 IST

मालाडच्या मालवणी येथे घडलेल्या दारूकांडातील बळींची संख्या ९० वर गेली असून, आणखी ४० जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

विषाचा पेला : मुख्य आरोपी गजाआड, भट्टीचा शोध मात्र सुरूचमुंबई : मालाडच्या मालवणी येथे घडलेल्या दारूकांडातील बळींची संख्या ९० वर गेली असून, आणखी ४० जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेला ७२ तास उलटूनही तीन गुत्त्यांवर दारू पिऊन आजारी पडलेले पालिका रुग्णालयांमध्ये भरती होत आहे. त्यामुळे बळींची संख्या शंभरावर पोहोचेल अशी भीती व्यक्त होत आहे.याप्रकरणी गुन्हे शाखेने सलीम मेहबूब शेख ऊर्फ जेंटल (३९) आणि फ्रान्सिस थॉमस डिमेलो (४६) दोन मुख्य आरोपींसह राजू हणमंता पास्कल उर्फ राजू लंगडा (५०), डोनाल्ड रॉॅबर्ट पटेल (४७) आणि गौतम हारटे (३०) अटक केली आहे. पोलीस ही दारु कोणत्या भट्टीवरून या गुत्त्यांवर आली, याचा शोध घेत आहेत.जेंटल व डिमेलो हे दोघे मुंबईत तयार झालेली किंवा मुंबई बाहेरून आलेली गावठी दारू खरेदी करून मालवणीतील छोट्या-मोठ्या गुत्त्यांवर विकतात. या दोघांनी दारूत मिथेनॉल मिसळले आणि ती पुढे गुत्त्यांवर पाठवली, अशी माहिती प्राथमिक तपासातून समोर आल्याचे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले. भट्टीत गाळलेली दारू दोन ते तीन टप्प्यांमध्ये मुंबईत येते आणि पुढे गुत्त्यांवर पोहोचते. यादरम्यान दारूची वाहतूक करणारे आणि प्रत्यक्ष दारू गाळणारे यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी जेंटल, डिमेलोला दारू विकणारा सापडणे महत्वाचे आहे, अशी माहिती मिळते.या दारूकांडाला जबाबदार धरून उत्पादन शुल्क विभागाने अंधेरी युनिटच्या चार अधिकारी-कर्मचाऱ्यांना निलंबित केले. निरीक्षक जगदीश देशमुख, राजेंद्र साळुंखे, शिपाई वर्षा वेंगुर्लेकर, धनाजी साळवी अशी त्यांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री हा निर्णय आयुक्त शामसुंदर शिंदे यांनी घेतला.दारूकांडाला जबाबदार धरून पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश पाटील यांना निलंबित केले. यासह आणखी सात जणांना निलंबित करण्यात आले. त्यामध्ये एपीआय जगदीश पन्हाळे, फौजदार शंकर घार्गे, मनीषा शिरसाट, हवालदार राम मिलन सिंह, अरुण जाधव, पोलीस नाईक संजय माने, विलास देसाई यांचा सहभाग आहे.इथाइल अल्कोहोलचा उताराशताब्दी रुग्णालयात आतापर्यंत १२४ रुग्ण उपचारासाठी दाखल झाले होते. यापैकी १७ जणांचा रुग्णालयात आणण्याआधीच मृत्यू झाला होता. रुग्णालयात उपचार घेत असताना ४१ जणांचा मृत्यू झाला. सायन, केईएम आणि नायर रुग्णालयात काही रुग्णांना हलवण्यात आले आहे. अत्यंत गंभीर प्रकृती असणाऱ्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे, हिमो डायलेसिसवरही ठेवण्यात आले. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याची माहिती रुग्णालयातून मिळाली आहे.मालाड मालवणी येथील दारूच्या गुत्त्यावर विषारी दारू प्यायल्यामुळे शकडो लोकांना त्रास होत आहे. मिथाइल अल्कोहोल जास्त प्रमाणात दारूत असल्यामुळे ही दारू प्यायलेल्या लोकांना उलट्या, जुलाब, पोटदुखीचा त्रास जाणवत आहे.मिथाइल अल्कोहोल हे शरीरास अत्यंत हानिकारक असते. किडनीच्या बरोबरीनेच इतर अवयवांना त्याचा त्रास होतो. यावर उपचार करण्यासाठी ‘अ‍ॅण्टिडोट’ पद्धतीचा वापर केला जातो. इथाइल अल्कोहोल डायल्सुट करून दिले जाते. १० टक्के इथाइल अल्कोहोल डायल्युट केल्यावर सलाइनमधून रुग्णांना दिले.मिथाइल अल्कोहोलमुळे किडनी निकामी होण्याचा धोका वाढतो. रुग्ण कोमात जाऊ शकतो. हे रोखण्यास डायल्युटेड इथाइल अल्कोहोल वापरले जाते, असे नायर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.एसीपी, डीसीपीला अभय ?ज्या ठिकाणी दारूकांड घडले तेथील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हे रोखण्याची व तपास करण्याची मुख्य जबाबदारी असलेल्या एसीपी सुधाकर पुजारी यांची मात्र कारवाईतून सुटका झाली. तसेच परिमंडळ ११ची जबाबदारी असलेले डीसीपी विक्रम देशमाने यांच्यावरही कारवाई झालेली नसल्याने पोलीस दलात आश्चर्य व्यक्त होत आहे.राजीनामा घ्या..विषारी दारूकांडाला उत्पादन शुल्क विभागाची निष्क्रियता कारणीभूत असल्याने मुख्यमंत्र्यांनी उत्पादन शुल्कमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. अवैध धंदे बंद करण्यासाठी राज्य सरकारला आणखी किती बळी हवेत. दारुकांडामुळे अवैध धंद्याला चाप लावण्यासाठी पूर्णवेळ गृहमंत्र्यांची गरज आहे. - राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते, विधानसभा