शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

माळशेज घाट बंदच!

By admin | Updated: August 8, 2016 01:36 IST

माळशेज घाटात गेल्या आठवड्यात कोसळलेली दरड व करंजाळे गावाजवळ रस्त्याला मोठ्या भेगा पडून रस्ता खचण्याची भीती निर्माण झाल्याने हा मार्ग आठवडाभरापासून बंद आहे.

खोडद : माळशेज घाटात गेल्या आठवड्यात कोसळलेली दरड व करंजाळे गावाजवळ रस्त्याला मोठ्या भेगा पडून रस्ता खचण्याची भीती निर्माण झाल्याने हा मार्ग आठवडाभरापासून बंद आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी सोमवारपर्यंत वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले असून मंगळवापर्र्यत वाहतूक सुरळीत होईल असे ठाणे राष्ट्रीय महामार्गाचे स्थापत्य अभियंता एस. के. चौधरी यांनी सांगितले. घाटात मंगळवारी (दि. २) रात्री दरड कोसळून या दरडीतील सर्व मलबा महामार्गावर आल्याने हा महामार्ग बंद ठेवण्यात आला होता. तर गुरुवारी (दि. ४) माळशेज घाटाच्या अलीकडे करंजाळे गावाजवळ या नगर-कल्याण महामार्गावर रस्त्याला मोठ्या भेगा पडून रस्ता खचण्याची भीती निर्माण झाली होती. राष्ट्रीय महामार्ग ठाणे विभागाच्या वतीने छत्री पॉइंटजवळील कोसळलेली दरड बाजूला करून महामार्ग मोकळा करण्यात आला आहे. तसेच राष्ट्रीय महामार्ग पुणे विभागाच्या वतीने करंजाळे गावाजवळ महामार्गाला भेग गेलेल्या ठिकाणी रस्त्याच्या खालच्या बाजूला मुरूम टाकून भराव करण्याचे काम सुरू आहे. दरड बाजूला करून महामार्ग मोकळा केल्यानंतर सदर कामाची माहिती स्थापत्य अभियंता एस. के. चौधरी यांनी ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांना कळवून घाट वाहतूक सुरू करण्याविषयी परवानगी मागितली होती. मात्र, त्यांनी पावसाचे प्रमाण, घाटात पावसामुळे कोसळण्याच्या अवस्थेतील दरडी व पर्यटकांची होणारी संभाव्य गर्दी या बाबींचा विचार करून माळशेज घाटातून वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. चालू वर्षी माळशेज घाटात विविध ठिकाणी दरडी कोसळण्याच्या ४ घटना घडल्या आहेत. दरड कोसळल्यानंतर दरडीतील मलबा बाजूला करण्यासाठी वेळ जातो. त्यातच घाट परिसरात सतत कोसळणारा मुसळधार पाऊस यामुळे कामात वारंवार व्यत्यय येत असल्याने या कामांना विलंब होत आहे. (वार्ताहर)