शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणविषयक कार्यशाळा

By admin | Updated: June 11, 2016 01:47 IST

यशवंतराव चव्हाण सभागृहात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने कुपोषणविरोधी चळवळ कार्यशाळा आयोजित करण्यात आली

वडगाव मावळ : पंचायत समितीच्या येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या वतीने कुपोषणविरोधी चळवळ कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.पोषण चळवळीमध्ये मावळ तालुक्यातील सर्व अंगणवाडी कार्यक्षेत्रामध्ये १५ एप्रिल २०१६ ते २६ जानेवारी २०१७ या कालावधीमध्ये राबविण्यात येणार आहेत. सदर कार्यक्रमातून मुख्यत्वे किशोरवयीन मुली, गर्भवती, स्तनदा माता व ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्य व पोषण याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेमध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वामन गेजगे यांनी किशोरवयीन मुली, गरोदर महिला व स्तनदा माता व ० ते ६ वर्षे वयोगटातील बालकांच्या आरोग्य व पोषण याबाबत मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका एस. एस. जोशी यांनी पोषण चळवळीविषयक माहिती दिली. पोषण चळवळीच्या वृद्धीपत्रकाचे प्रकाशन पंचायत समिती सभापती मंगला वाळुंजकर यांच्या हस्ते करण्यात आले. गटविकास अधिकारी नीलेश काळे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, तालुका पशुसंवर्धन अधिकारी डॉ. वायदंडे, कृषी अधिकारी संताजी जाधव, तालुक्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका व सेविका, तसेच आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्तावना बालविकास प्रकल्प अधिकारी ए. आर. गुजर यांनी केले. (वार्ताहर)>७ जून रोजी सर्व बालकांची पालकांच्या समोर उंची घेण्यात आली असून, १५ जून रोजी सर्व बालकांचे पालकांच्या समोर दंडघेर मोजण्यात येणार आहे. सर्व बालकांचे सद्य:स्थितीविषयी ग्रामपंचायतीस अवगत करून त्याचे २६ जानेवारी २०१७ला ग्रामसभेत वाचन करण्यात येणार आहे. या चळवळीचा मुख्य उद्देश आहार व आरोग्याविषयी लोकांमध्ये जनजागृती करून कार्यक्रमामध्ये लोकांचा सहभाग वाढवणे आहे.