शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कुपोषणाचा सामना युद्धपातळीवर करावा लागेल - राज्यपाल

By admin | Updated: September 27, 2016 21:59 IST

कुपोषण आणि बालमृत्यूच्या घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यासाठी युद्धपातळीवर प्राधान्यक्रमाने काम करावे लागेल

रवींद्र साळवे/ऑनलाइन लोकमतमोखाडा, दि. 27 - कुपोषण आणि बालमृत्यूच्या घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यासाठी युद्धपातळीवर प्राधान्यक्रमाने काम करावे लागेल, असे मत महाराष्ट्राचे राज्यपाल विद्यासागर राव यांनी आज व्यक्त केले. श्रमजीवी संघटना आणि समर्थन संस्थेच्या शिष्टमंडळासोबत आज ( ता. २७) राजभवनावर झालेल्या बैठकीत ते बोलत होते. सरकार सोबत संस्था- संघटनांनीही या मोहिमेत सहभागी व्हायला हवे, असेही ते म्हणाले. कुपोषण आणि दारिद्र्य निर्मूलनासाठी संघटना सरकारला आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, असे आश्वासन विवेक पंडित यांनी यावेळी राज्यपालांना दिले. पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेले बालमृत्यू आणि  कुपोषणाच्या प्रश्नावर गेले अनेक दिवस श्रमजीवी संघटना सातत्याने आंदोलन करत आहे. सोबतच कुपोषण निर्मूलनाची मोहीम राबवून स्वयंसेवी तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने आरोग्य शिबिर देखील घेतले जात आहे. कुपोषणाचे प्रमाण लक्षणीय असतानाही सरकार यासाठी ठोस उपाययोजना करत नसल्याने श्रमजीवी संघटनेने या प्रश्नावर रान उठवले होते. 

दरम्यान विवेक पंडित यांनी राज्यपालांचे लक्ष या प्रश्नावर वेधले होते. याच पार्श्वभूमीवर आज राजभवनात राज्यपाल विद्यासागर राव यांच्या सोबत श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ आणि राज्यपालांचे सचिव अशी बैठक पार पाडली. सुमारे एक तास चाललेल्या बैठकीत खूप सकारात्मक चर्चा झाली. कुपोषण हे गंभीर संकट असून त्या विरोधात युद्धपातळीवर लढायला हवे असे मत व्यक्त करत तुम्ही याबाबत सक्षम उपाय सुचवावा असेहि राज्यपालांनी शिष्टमंडळाला सांगितले. विवेक पंडित यांनी कुपोषणाचा संबंध रोजगार आणि दरिद्र्याशी असल्याचे स्पष्ट करत यावर तत्कालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना काय आणि कशा  असाव्यात याचा संपूर्ण तपशील राज्यपालांसमोर मांडला. राज्यभरातील प्रशासकीय अनुशेष आणि पालघर या नवनिर्मित जिल्ह्याच्या रिक्त पदं, समस्या आणि सरकारी अनास्थेबाबत आकडेवारीसह पूर्ण लेखाजोखा पंडित यांनी राज्यपालांसमोर मांडला. राज्यपालांनी अत्यंत संवेदनशीलतेने सर्व मुद्यावर तपशीलवार चर्चा करून याबत सर्वसमावेशक आराखडा करणार आल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. तसे निर्देशही त्याच्या सचिवांना दिले. यावेळी विवेक  पंडित यांनी राज्यपालांना श्री विठ्लाची मूर्ती आणि रोपं भेट दिली.

या शिष्टमंडळात श्रमजीवी आणि समर्थनचे संस्थापक विवेक पंडित, बाळाराम भोईर, विजय जाधव, दत्तू कोळेकर, सुरेश रेंजड, अशोक सापटे,प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, रुपेश किर, सरिता जाधव, पांडुरंग मालक,संतोष धिंडा,विलास सुरवसे आणि बालरोग तज्ञ डॉ.हेमंत जोशी, डॉ.गोपाळ कडवेकर, डॉ.आशिष भोसले,डॉ.वर्षा भोसले, डॉ.मोहन ढुधाट हे देखील उपस्थित होते.