शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासीमंत्र्यांच्या शिवारातच कुपोषण

By admin | Updated: March 11, 2016 04:18 IST

पालघर व ठाणे जिल्ह्यातील ५४ हजार ९१५ बालके कुपोषित आहेत. या भागाला भेट देऊन पाहणी केली असता सरकारी यंत्रणेने वेळीच

सुरेश लोखंडे ,  ठाणेपालघर व ठाणे जिल्ह्यातील ५४ हजार ९१५ बालके कुपोषित आहेत. या भागाला भेट देऊन पाहणी केली असता सरकारी यंत्रणेने वेळीच दखल घेतली नाही, तर २३ वर्षांपूर्वी याच परिसरात झालेल्या भीषण बालमृत्यूंची पुनरावृत्ती अटळ असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांच्या मतदारसंघातच कुपोषणाने कहर केला आहे.जव्हार, मोखाडा तालुक्यांतील दाभोसा, चिरेचापाडा, कोंगदा, वनवासी आदी परिसरांसह वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांवर कुपोषित बालके असून मंत्री विष्णू सवरा यांच्या विक्रमगड मतदारसंघातच सर्वाधिक कुपोषित बालके असल्याची कबुली अधिकाऱ्यांनी दिली. पालघर जिल्ह्यात ४३ हजार ५५७ बालके कुपोषित आहेत. यात तीव्र कुपोषित सात हजार ९१ बालकांचा समावेश आहे. ठाणे जिल्ह्यात१० हजार ३५८ बालके कुपोषित आहेत. यातील एक हजार ५३१ बालके तीव्र कुपोषित आहेत. सध्या या परिसरात वैद्यकीय सुविधा, रोजगार व प्रशासकीय यंत्रणांच्या जागरूकतेची कमतरता असल्याचे प्रत्यक्ष भेटीत जाणवले.दाभोसा या सुमारे २५० लोकवस्तीच्या पाड्यावर पाच बालकांची प्रकृती अत्यंत खराब असल्याचे दिसून आले. यातील दुर्गा ही एक वर्षाची बालिका अत्यंत कमी वजनाची आहे. जन्मत:च केवळ दोन किलो वजनाची असलेली दुर्गा कशी जगवायची, हा तिच्या मातापित्यापुढील प्रश्न आहे. गावातील आदिवासींना पाणी मिळावे, याकरिता जलस्वराज योजनेतून विहीर खोदण्यात आली. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने विहिरीचे पाणी एका मुंबईकराच्या रिसॉर्टला दिले जात आहे, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली. १० वर्षांपूर्वी इंदिरा आवास योजनेतून घरकुलच्या केवळ विटा आदिवासींना मिळाल्या. भिंती उभारण्याचा किंवा पत्र्यांची खरेदी या आदिवासींनीच केल्याचे गावकरी सांगतात. विक्रमगड तालुक्यातील सजनपाड्यातील घराघरांत कुपोषित बालके असतानाही दरवर्षी पाळणा हलत आहे. जव्हारच्या वावर चौकीची तारा ही जेमतेम १६ वर्षांची अविवाहित मुलगी कुमारीमाता झाली आहे. तिचा सुदर्शन हा दीड वर्षाचा मुलगा कुपोषित आहे.