शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल्यांच्या कर्ज घोटाळ्यात बँकांचीही होणार चौकशी?

By admin | Updated: June 27, 2016 04:59 IST

उद्योेगपती विजय मल्ल्या यांना कर्ज देताना बँकांनीही काही गैरप्रकार केले का, याची चौकशी ‘सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन आॅफिस’ (एसएफआयओ)ने सुरू केली आहे.

मुंबई : आता गाशा गुंडाळलेल्या किंगफिशर एअरलाइन्सच्या नावे सरकारी बँकांची नऊ हजार कोटी रुपयांची कर्जे बुडवून परदेशात जाऊन बसलेले उद्योेगपती विजय मल्ल्या यांना कर्ज देताना बँकांनीही काही गैरप्रकार केले का, याची चौकशी ‘सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन आॅफिस’ (एसएफआयओ)ने सुरू केली आहे.खासकरून सरकारी बँकांमध्ये होणाऱ्या घोटाळ्यांचा तपास करणारी ‘एसएफआयओ’ ही विशेष यंत्रणा असून, त्यांत विविध तपासी संस्थांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असतो. संशयित घोटाळ्याचे गांभीर्य व व्याप्ती लक्षात घेऊनच त्याच्या तपासाचे काम या यंत्रणेकडे सोपविले जाते. ‘एसएफआयओ’ने मल्ल्यांच्या ‘कर्जघोटाळ्या’त लक्ष घालावे यावरूनच या व्यवहारात बँकांचे हातही स्वच्छ नसावेत, याविषयी सरकारला सकृतदर्शनी ठाम शंका असल्याचे मानले जात आहे.सरकारी बँकांमधील एका वरिष्ठ सूत्राने सांगितले की, किंगफिशरला कर्जे दिलेल्या सर्व बँकांकडून ‘एसएफआयओ’ने अलीकडेच या कर्जांसंबंधीचा सर्व तपशील मागविला व बँकांनीही ती माहिती दिली आहे. यावरून कर्ज देताना सर्व नियमांचे कसोशीने पालन केले गेले होते की नाही हे तपासले जाणार असल्याचे उघड आहे.‘एसएफआयओ’ किंगफिशर एअरलाइन्समधील कथित वित्तीय गैरव्यवहारांची चौकशी करीत असल्याचे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात अलीकडेच सांगितले होते. हा तपास सुरू असल्याने अधिक सांगणे योग्य होणार नाही, असे जेटली म्हणाले होते. हा संदर्भ कर्ज घेणाऱ्याच्या संबंधात होता. आता ‘एसएफआयओ’ करत असलेला तपास दुसऱ्या बाजूने म्हणजे कर्ज देणाऱ्यांच्या बाजूने होत आहे.आयडीबीआय बँकेच्या ९०० कोटी रुपयांच्या कर्जाच्या संदर्भात सुरू असलेल्या तपासात वारंवार समन्स काढूनही मल्ल्या चौकशीसाठी न आल्याने अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केलेल्या अर्जावर मनी लॉड्रिंग प्रतिबंधक कायद्याखालील विशेष न्यायालयाने १४ जून रोजी मल्ल्या यांना ‘फरार’ घोषित केले होते. याच प्रकरणात ‘ईडी’ने मल्ल्या आणि त्यांच्या युनायटेड ब्रुअरिज (यूबी) या कंपनीच्या १,४११ कोटी रुपयांच्या मालमत्तांवर टाच आणली आहे.किंगफिशर प्रकरणात कर्ज देणाऱ्या १७ बँकांनी कर्ज वसुली न्यायाधिकरणात तगादा लावल्यानंतर गेल्या ७ मार्च रोजी मल्ल्या डिप्लोमॅटिक पासपोर्टवर लंडनला निघून गेले ते परत आलेले नाहीत. (विशेष प्रतिनिधी)