शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल्याची संपत्ती होणार जप्त

By admin | Updated: November 12, 2016 04:15 IST

आयडीबीआय बँकेचे ९०० कोटी रुपये बुडवून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याची देशातील १७०० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता लवकरच जप्त करणार असल्याची माहिती

मुंबई : आयडीबीआय बँकेचे ९०० कोटी रुपये बुडवून परदेशात फरार झालेल्या विजय मल्ल्याची देशातील १७०० कोटी रुपयांची जंगम मालमत्ता लवकरच जप्त करणार असल्याची माहिती शुक्रवारी सक्तवसुली संचालयानाच्या अधिकाऱ्यांनी (ईडी) दिली. गुरुवारीच विशेष पीएमएलए (प्रिव्हेन्शन आॅफ मनी लाँड्रिंग अ‍ॅक्ट) न्यायालयाने मल्ल्याला फरारी घोषित करून त्याची जंगम मालमत्ता जप्त करण्याची ईडीला परवानगी दिली.

विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशाची मूळ प्रत हातात पडली, की आम्ही तातडीने मल्ल्याच्या नावावर असलेले शेअर्स ताब्यात घेऊ. मल्ल्याची जंगम मालमत्ता व शेअर्सची किंमत एकूण १७०० कोटी रुपये आहे. ही जप्ती फौजदारी दंडसंहिता (सीआरपीसी) अंतर्गत करण्यात येणार आहे.

यापूर्वी ८,०४० कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीने केलेल्या अर्जावरील सुनावणीत विशेष न्यायालयाने मल्ल्याची जंगम मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देत त्याला फरारी घोषित केले. मात्र मल्ल्याची परदेशातील संपत्ती जप्त करण्याचा आदेश देण्यास नकार दिला. परदेशातील संपत्तीचे कागदपत्र सादर करा, मग त्यावर विचार करू, असे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले. मल्ल्या देशात परत यायला तयार नसल्याने ईडीने त्याला फरारी म्हणून घोषित करावे व त्याची सर्व संपत्ती जप्त करण्यासाठी आॅक्टोबरमध्ये अर्ज केला होता. ईडीच्या इतिहासात सर्वात मोठी कारवाईआयडीबीआय बँकेचे घोटाळा आणि पीएमएलएअंतर्गत नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी ईडीला मल्ल्याची चौकशी करायची आहे. मल्ल्याला देशात परत आणण्यासाठी इंटरपोल अरेस्ट वॉरंट जारी करण्यात आले. तसेच त्याचा पासपोर्ट जप्त करूनही त्याला देशात परत येता यावे, यासाठी पासपोर्टची तात्पुरती सोय करून देण्याची तयारीही तपासयंत्रणेने दाखवली. मात्र मल्ल्या कशालाच दाद देत नसल्याने अखेरीस ईडीने त्याची मालमत्ता जप्त करण्याचा मार्ग निवडला. पीएमएलए कायद्यांतर्गत ईडीने मल्ल्याची आतापर्यंत ८,०४१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. ईडीच्या इतिहासात ही सगळ्यात मोठी जप्ती आहे.