शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

मालेगावमध्ये टेक्स्टाईल पार्क, राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी : ३०० कोटी रुपये खर्च करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 04:28 IST

नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरानजीक १२ किलोमीटरवर अत्याधुनिक सुविधांसह महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे

विशेष प्रतिनिधीमुंबई : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरानजीक १२ किलोमीटरवर अत्याधुनिक सुविधांसह महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळामार्फत (एमआयडीसी) टेक्स्टाईल पार्क उभारण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत तसा प्रस्ताव मंजूर करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी राज्य शेती महामंडळाच्या मालकीची सुमारे ७०० हेक्टर जमीन घेण्यात येणार आहे. या महामंडळाकडून मालेगावच्या पूर्व भागात असलेली ही जमीन एमआयडीसीला हस्तांतरीत करण्यात येणार आहे. या संदर्भात सहा महिन्यांपूर्वी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठकदेखील झाली होती.यंत्रमाग आणि हातमागासाठी प्रसिद्ध असलेल्या मालेगावमधील वस्रोद्योग या पार्कच्या निमित्ताने कात टाकणार आहे. मुंबई, ठाणे, भिवंडी परिसरातील अनेक वस्रोद्योग मालकांना स्थलांतरित होण्याची इच्छा आहे. अशा उद्योगांना मालेगावच्या टेक्स्टाईल पार्कमध्ये येण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे. अमरावती येथे शासनाचा टेक्स्टाईल पार्क आधीपासूनच आहे. मालेगावमध्ये या आधीही टेक्स्टाईल क्लस्टरची घोषणा झाली होती पण एकही उद्योग त्या ठिकाणी आला नाही.आता नवीन टेक्स्टाईल पार्कमध्ये वस्रोद्योग मोठ्या प्रमाणात यावेत यासाठी काही विशेष सवलती राज्य शासनाकडून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. कुशल आणि अकुशल कामगार हे कमी मजुरीवर उपलब्ध होतील. त्यामुळे वस्रोद्योग या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आकर्षित होतील, असा शासनाचा कयास आहे.