शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मलेरिया विभागाचा कारभार अकोलेकरांच्या मुळावर!

By admin | Updated: March 3, 2017 01:33 IST

डासांची पैदास वाढली; फवारणीला खो!

अकोला, दि.२ : शहरात डासांची पैदास वाढली असून त्यांच्या उच्छादामुळे अकोलेकर हैराण झाले आहेत. मनपाच्या अखत्यारित असलेल्या मलेरिया विभागाचा ढेपाळलेला कारभार अकोलेकरांच्या मुळावर उठला असून या विभागातील मस्तवाल अधिकारी-कर्मचाऱ्यांचा प्रशासनाने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मागील महिनाभरापासून साचलेली डबकी, निचरा न होणाऱ्या सांडपाण्यात डासांची पैदास वाढल्याचे चित्र आहे. सायंकाळ होताच डासांचा उपद्रव सुरू होतो. डासांची पैदास रोखण्यासाठी महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या मलेरिया विभागाने कार्यरत राहण्याची गरज आहे; परंतु या विभागाचे कामकाज हवेत सुरू असल्याची परिस्थिती आहे. दक्षिण झोन अंतर्गत मनपाच्या इमारतीमध्ये मलेरिया विभागाचे कार्यालय केवळ नावापुरते थाटण्यात आले आहे. या विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रभागांमध्ये दररोज धुरळणी व फवारणी करणे अपेक्षित आहे. नगरसेवकांनी तक्रार केल्यास संबंधित कर्मचारी अवघ्या अर्धा तासात फवारणी करून कामावरून पळ काढत असल्याची माहिती आहे. या प्रकाराला खुद्द नगरसेवकही कंटाळले आहेत. मलेरिया विभागाकडे तक्रार केल्यास थातूर-मातूर फवारणी केली जाते. फवारणीसाठी लागणारे रसायन शासनामार्फत प्राप्त होत असताना मलेरिया विभागाकडून आखडता हात का घेतला जातो, असा सवाल उपस्थित होत आहे. कर्तव्यातून पळ काढण्याच्या मानसिकतेमुळे मलेरिया विभागाचा कारभार पुरता ढेपाळला असून त्याचे परिणाम अकोलेकरांना भोगावे लागत आहेत. डासांची पैदास वाढल्याने लहान मुलांमध्ये विविध आजारांचा फैलाव होत आहे. विभागावर नियंत्रणच नाही!मलेरिया विभागाचे कामकाज सांभाळण्यासाठी शासनाकडून वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाते. या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनामार्फत मनपाकडे अनुदान जमा होते. वेतन अदा करण्यापलीकडे मलेरिया विभाग कोणती जबाबदारी पार पाडतो, यावर मनपा प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामाचेही मूल्यमापन होत नसल्याची परिस्थिती आहे.कर्मचाऱ्यांची झोननिहाय व्हावी नियुक्ती!डासांचा उच्छाद वाढल्यास नगरसेवकांकडून मलेरिया विभागाशी संपर्क साधला जातो. अवघ्या अर्ध्या-एक तासात संबंधित कर्मचारी फवारणी करून निघून जातो. सात तास हा कर्मचारी जातो कुठे, असा सवाल उपस्थित होतो. यासाठी मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांची झोननिहाय नियुक्ती करून त्यांच्यावर क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे नियंत्रण असणे अनिवार्य झाले आहे.