शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
4
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
5
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
6
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
7
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
8
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
9
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
10
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
11
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
12
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
13
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
14
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
15
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
17
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
18
गरिबांच्या खिशावर ‘दरोडा’ टाकणाऱ्या लाचखोरांच्या मालमत्तेवर ‘हातोडा’ कधी?
19
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
20
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली

स्वत:च्याच खुनाचा बनाव

By admin | Updated: May 20, 2016 01:24 IST

मद्यपी तरुणाचा खून करून त्याचा चेहरा जाळून स्वत:चाच खून झाल्याचा बनाव रचणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले

पुणे : मद्यपी तरुणाचा खून करून त्याचा चेहरा जाळून स्वत:चाच खून झाल्याचा बनाव रचणाऱ्याला भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले आहे. कर्जबाजारीपणामुळे सावकारांची दिशाभूल करण्यासाठी त्याने हे कृत्य केल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती परिमंडल दोनचे उपायुक्त पंकज डहाणे, उपायुक्त दीपक साकोरे यांनी दिली. मंगळवारी सकाळी एका अज्ञात तरुणाचा मृतदेह कात्रज येथील अभिनव महाविद्यालयाजवळ आढळून आला होता. अविनाश ऊर्फ पप्पू संपत मरळ (वय ३१, रा. जनता वसाहत) असे खून झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणी सतीश बाबू भालेराव (वय ३५, रा. बिबवेवाडी) याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भालेराव याचे लग्न झालेले असून त्याला २ मुली आहेत. भालेराव रात्री रिक्षा चालवतो. दारूचे व्यसन असल्यामुळे त्याच्यावर ७ लाख रुपयांचे कर्ज होते. या पैशांसाठी सावकार त्याच्यामागे तगादा लावत होते. तर खून झालेला अविनाश २ बहिणींसह राहण्यास होता. तो पेंटिंगची कामे करायचा. सोमवारी भालेराव दांडेकर पूल भागात गेला होता. तेथे दारूच्या नशेत बेधुंद झालेल्या अविनाशला त्याने निलायम सिनेमागृहाजवळ रिक्षामध्ये कोंबले. कात्रज बाह्यवळण रस्त्यावरच्या अभिनव महाविद्यालयाजवळील लक्ष्मीबाई हजारे वसतिगृहापाशी नेले. त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्यावर अंगावर आणि चेहऱ्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. स्वत:च्या अंगावरील कपडे अविनाशच्या अंगावर चढवले. त्याचे कपडे जाळून टाकल्यानंतर स्वत:चा बूट अविनाशच्या पायात घातला. मृतदेहाच्या अंगावरच्या कपड्यांच्या खिशामध्ये स्वत:चे आधारकार्ड आणि काही कागदपत्रे ठेवली. मंगळवारी सकाळी मृतदेह आढळल्यानंतर पोलीस घटनास्थळी धावले व तपासाला सुरुवात केली. आधारकार्डवरून पोलीस भालेरावच्या घरी पोचले. त्यांनी कुटुंबीयांना मृतदेह दाखवला. मात्र, तो भालेरावचा नसल्याचे समजल्यावर पोलिसांनी भालेरावचा शोध सुरु केला. पोलीस कर्मचारी सचिन ढवळे, गणेश चिंचकर, प्रणव संकपाळ यांना आरोपी हुबळी येथे असल्याची माहिती मिळाली. सुरुवातीला मित्राकडे खेडशिवापूरला गेलेला भालेराव ट्रकने कोल्हापूर आणि तेथून हुबळी येथे गेला. पोलिसांनी माग काढत हुबळीमधून मुसक्या आवळल्या.