शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

लष्करी उपायांसह ‘अखंड भारत’ करा

By admin | Updated: July 14, 2017 01:24 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानसह अखंड भारताची निर्मिती करावी

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शांततेसह सहअस्तित्व कायम ठेवण्यासाठी आणि भारत हाच जगातील सर्वांत शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे येण्यासाठी सर्व लष्करी उपाय योजून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानसह अखंड भारताची निर्मिती करावी, असा ठराव आज पुण्यातील मुस्लिम समुदायाच्या संघटना, मौलवी, इमाम आणि मशिदीतील मुतवल्ली यांच्या बैठकीत करण्यात आला. बैठकीत संमत केलेला ठराव : पवित्र अमरनाथ यात्रेतील यात्रेकरूंवर झालेल्या अमानुष गोळीबारात मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ल्याचा निषेध करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. अवामी महाज या सामाजिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. मौलाना निजामुद्दीन (मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड मेंबर), मौलाना अय्युब अश्रफी (अध्यक्ष, पुणे जिल्हा सुन्नी जमात), मुफ्ती अहमद हसन (आॅल इंडिया इमाम्स कौन्सिल), अनीस चिश्ती, (ज्येष्ठ अभ्यासक), डॉ. पी. ए. इनामदार (अध्यक्ष, अवामी महाज), एस.बी.एच. इनामदार, शेख चाँद सरदार, वाहिद बियाबानी (सचिव, अवामी महाज), लतीफ मगदूम (सचिव, महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी), इक्बाल मुलाणी, शफी हसन काझमी, शेख शाहिद मुनीर, अब्दुल वहाब शेख हे मान्यवर या बैठकीत सहभागी झाले होते. गुरुवारी सकाळी आझम कॅम्पस येथे ही बैठक झाली. धार्मिक कट्टरतावादाचा निषेध आहेच; पण कोणीही त्याचा राजकारणासाठी उपयोग करू नये, असे अनीस चिश्ती म्हणाले.>बैठकीत संमत केलेला ठराव भारताच्या सर्व सीमांवर शांतता निर्माण झाल्याशिवाय आम्हा सर्व भारतीयांची चौफेर आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होणार नाही याची जाणीव ठेवून आहोत. भारताच्या सीमा शांततामय न राहिल्यामुळे मोठ्या प्रमाणावर लष्कर, लष्करी सामग्री व इतर बाबींवर गेली सत्तर वर्षे प्रचंड प्रमाणात खर्च करत आहोत. सदर खर्च वाढत असल्याने अनेक प्रगतीच्या योजना अमलात आणू शकलो नाही.या करिता ब्रिटिशांनी पूर्वनियोजित कालानुसार भारताची फाळणी केली ही अनैसर्गिक होती व आहे, करिता आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नम्र विनंती करत आहोत, की सर्व लष्करी उपाय योजून पाकिस्तान, बांगलादेश तसेच अफगाणिस्तानसह अखंड भारताची निर्मिती करावी, जेणे करून स्वातंत्र्यापूर्वी व नंतर भारतीय नेत्यांनी जी स्वप्ने पाहलिी होती ती पूर्ण करणे शक्य होईल. त्याचप्रमाणे भारत जगातील सर्वांत शक्तिशाली राष्ट्र म्हणून पुढे येऊ शकेल, असे घडल्यास भारतीय संस्कृतीचा शांततेचा सहअस्तित्वाचा संदेश कृतीसह जगात अमलात आणता येईल. अमरनाथ यात्रेकरूंवरील हल्ला, पाकिस्तानची दहशतवादी कृत्ये यांचा सर्व वक्त्यांनी निषेध केला. सर्व धर्मांनी मानवता, सलोखा, शांततेचा संदेश दिला आहे. दहशतवाद्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे. बंधुभाव कायम राहिला पाहिजे, अशा भावना व्यक्त केल्या. डॉ. पी. ए. इनामदार यांनी ठराव मांडला आणि उपस्थित सर्वांनी एकमताने तो मंजूर केला. शुक्रवारी पुण्यातील सर्व मशिदींमध्ये हा ठराव वाचून दाखवला जाणार आहे.