शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

सहा महिन्यांत टेस्ट ट्रॅक उपलब्ध करा

By admin | Updated: August 23, 2016 05:58 IST

टेस्ट ट्रॅक सहा महिन्यांत उपलब्ध करण्याची हमी द्या अन्यथा मुख्य सचिवांना अवमान नोटीस बजावू, अशी तंबी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली.

मुंबई : राज्यातील प्रत्येक आरटीओमध्ये २५० मीटरचे टेस्ट ट्रॅक सहा महिन्यांत उपलब्ध करण्याची हमी द्या अन्यथा मुख्य सचिवांना अवमान नोटीस बजावू, अशी तंबी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिली. हमी देण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. आरटीओ वाहनांची योग्यप्रकारे चाचणी न करता फिटनेस सर्टिफिकेट व ब्रेक टेस्ट सर्टिफिकेट देते. त्यामुळे अपघातांत वाढ झाली आहे. राज्य सरकारच्या या ढिसाळ कारभारामुळे अनेकांचे जीव धोक्यात येत आहेत. त्यामुळे परिवहन विभागाला वाहनांची योग्यप्रकारे चाचणी घेऊनच फिटनेस व ब्रेक टेस्ट सर्टिफिकेट देण्याचा आदेश द्यावा, यासाठी पुण्याच्या श्रीकांत कर्वे यांनी अ‍ॅड. उदय वारुंजीकर यांच्यामार्फत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.गेल्या सुनावणीत राज्य सरकारने टेस्ट ट्रॅकसाठी जागा उपलब्ध नसल्याने ट्रॅकची रुंदी २५० मीटरहून १५० मीटरवर आणण्याची मुभा द्यावी, अशी विनंती केली होती. मात्र सोमवारी खंडपीठाने कायद्यामध्येच ही तरतूद असल्याने कोणत्याही प्रकारची सुधारणा करता येणार नाही, असे सरकारला बजावत टेस्ट ट्रॅकची रुंदी कमी न करता येत्या सहा महिन्यांत सर्व आरटीओंमध्ये अडीचशे मीटरच ट्रॅक उपलब्ध करण्यात येतील, अशी हमी द्या, असे म्हटले. ‘हमी नाही दिली तर मुख्य सचिवांविरुद्ध अवमान नोटीस बजावू,’ अशी तंबीही खंडपीठाने राज्य सरकारला दिली. (प्रतिनिधी)>१८ आॅगस्टनंतरची सर्टिफिकेट अवैध?उच्च न्यायालयाने १६ फेब्रुवारी रोजी राज्य सरकारला सहा महिन्यांत राज्यातील सर्व आरटीओंमध्ये अडीचशे मीटर टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्याचा आदेश दिले. राज्य सरकार अडीचशे मीटरचे टेस्ट ट्रॅक उपलब्ध करण्यास अपयशी ठरले तर त्यानंतर सर्टिफिकेट देऊ नयेत, असे कोर्टाने फेब्रुवारीच्या आदेशात स्पष्ट म्हटले आहे. ही मुदत १८ आॅगस्टला संपली. त्यामुळे राज्यातील आरटीओंनी १८ आॅगस्टनंतर दिलेली फिटनेस किंवा ब्रेक टेस्ट सर्टिफिकेट्स उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून देण्यात आलेली आहेत. त्यासंदर्भातील अर्ज तयार न ठेवल्यास कारवाई करण्यात येईल, असे खंडपीठाने म्हटले.