शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

ध्वनिक्षेपण मर्यादा २५ दिवस करा

By admin | Updated: March 1, 2017 04:47 IST

ध्वनीक्षेपणाची वेळ मर्यादा १५ दिवसांऐवजी २५ दिवस इतकी वाढवून द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे.

मुंबई : ध्वनीक्षेपणाची वेळ मर्यादा १५ दिवसांऐवजी २५ दिवस इतकी वाढवून द्यावी, अशी मागणी राज्य सरकारने केंद्राकडे केली आहे. ध्वनिक्षेपणासाठी सध्या केंद्राच्या कायद्यानुसार रात्री १० पर्यंतची मर्यादा असते. त्यातून केवळ १५ दिवसांची सूट देण्यात आली असून या १५ दिवसांत रात्री १२ पर्यंत ध्वनिक्षेपण करता येतात. ही सूट २५ दिवसांकरता असावी, अशी मागणी राज्याने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री अनिल दवे यांच्या नवी दिल्लीतील बैठकीत मंगळवारी या संदर्भात चर्चा झाली. जुलैपूर्वी या संदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दवे यांनी दिले.झुडपी जंगलांची कटकट संपणारविदर्भातील सहा जिल्ह्णांमध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या झुडपी जंगलांचा प्रश्न सोडविला जाईल आणि त्यातील ४० हजार हेक्टर जमीन ही महसुली असल्याचे प्रमाणित केले जाईल, असे आश्वासन अनिल दवे यांनी यावेळी दिले. विदभार्तील नागपूर, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या सहा जिल्ह्णांत झुडपी जंगलांचा प्रश्न आहे. तेथे प्रत्यक्षात वन नाहीच पण कागदोपत्री तसा उल्लेख केल्याने विकास कामे हाती घेता येत नाहीत. झुडपी जंगलाची ही नोंद बदलण्यात यावी. झुडपी जंगल जमीनचा पट्टा हा ९० हजार हेक्टरचा आहे. तो कमी करून तो ५० हजार हेक्टरचा करण्यात यावा, अशी मागणीही बैठकीत करण्यात आली.गोरेवाडाबाबत चर्चाबहुप्रतीक्षित नागपुरातील गोरेवाडा प्राणीसंग्रहलयासाठीची जंगल जमीन गैर-वन-जमीनसंदर्भात बैठकीत चर्चा झाली. त्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला आहे. या ठिकाणी प्राणीसंग्रहालय तसेच खुली सफारी बनविण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यासाठी केंद्राकडून किती जागा दिली जाईल याबाबत अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही. तो लवकर घेतल्यास प्राणीसंग्रहालयाच्या कामास गती मिळेल. याविषयांवर आणखी सविस्तर चर्चा करण्यासाठी विशेष बैठक लवकरच आयोजित केली जाणार असल्याचे दवे यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)>अरबी समुद्रातील दूषित पाण्याबाबत उपाययोजनाअरबी समुद्रात जाणाऱ्या प्रदूषित पाण्याबाबत केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने ठोस उपाययोजना आखावी, अशी सूचना फडणवीस यांनी केली.मुंबईतील वाढती लोकसंख्या पाहता मालाडच्या सीवरेजमधून दररोज २५ लाख लोकांचे मल व अन्य प्रदूषित जल नि:स्सारण होते त्यामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यसाठी केंद्राने ठोस उपाययोजना आखावी, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.>नवी मुंबई विमानळाच्या अटींची पूर्तता लवकरचनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाबाबत काही अटी-शर्र्थींमध्ये केंद्र सरकारला अपेक्षित असलेल्या बदलांची पूर्तता राज्याकडून लवकरच केली जाईल,असे राज्य शासनातर्फे बैठकीत सांगण्यात आले.