शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांमध्ये आपुलकीची भावना निर्माण करा

By admin | Updated: April 21, 2015 01:07 IST

जिल्ह्यातील शेकडो रुग्ण आपण बरे होऊ या आशेने वैद्यकीय महाविद्यालयात येतात. डॉक्टरांनीही त्यांच्यावर योग्य उपचार करून आपुलकीची भावना

यवतमाळ : जिल्ह्यातील शेकडो रुग्ण आपण बरे होऊ या आशेने वैद्यकीय महाविद्यालयात येतात. डॉक्टरांनीही त्यांच्यावर योग्य उपचार करून आपुलकीची भावना निर्माण केल्यास त्यांच्या मनात शासकीय रुग्णालयाबाबत विश्वास निर्माण होईल, असे प्रतिपादन वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अभ्यागत मंडळाचे अध्यक्ष खासदार विजय दर्डा यांनी सोमवारी केले. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात अभ्यागत मंडळाची बैठक सोमवारी झाली. या वेळी पालकमंत्री संजय राठोड, आमदार मदन येरावार, आमदार ख्वाजा बेग, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती नरेंद्र ठाकरे, जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, माजी आमदार डॉ. संदीप धुर्वे, अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड उपस्थित होते. रुग्णालयातील सोयी-सुविधा, औषधी, उपकरणे, वीजपुरवठा, परत जाणारा निधी, अस्वच्छता, यंत्रणेची अनुपस्थिती अशा विविध मुद्द्यांवर ही बैठक गाजली. या वेळी विजय दर्डा म्हणाले, की वसंतराव नाईकांच्या नावाने हे महाविद्यालय चालविले जाते. त्यामुळे या नावाचा योग्य सन्मान राखला पाहिजे. व्हीआयपी आणि सामान्यांना सारखीच ट्रीटमेंट द्या़ महाविद्यालयातून रुग्ण समाधानी होऊन घरी जाणे गरजेचे आहे. रुग्णांना येथेच औषधी व उपचार उपलब्ध झाले पाहिजे. त्यांच्यावर औषधीसाठी बाहेर जाण्याची वेळ येऊ नये. शासनस्तरावर दर करार न झाल्याने औषधी खरेदीत अडचण येत असल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. महाविद्यालयात स्वतंत्र उपकेंद्र उभारूनही सलग वीज मिळत नसल्याचा मुद्दा यावेळी उघड झाला. वीज कंपनीचे अधिकारी त्यावर समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. बैठकीला गैरहजर असलेल्या वीज अधीक्षक अभियंत्याला जाब विचारण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. (प्रतिनिधी)