शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

अफवा पसरविणाऱ्यांवर करा कारवाई !

By admin | Updated: June 25, 2015 01:53 IST

मुंबईत चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, या आशयाचे संदेश व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पसरवून अकारण जनतेमध्ये घबराटीचे वातावरण

मुंबई : मुंबईत चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, या आशयाचे संदेश व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून पसरवून अकारण जनतेमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण करण्यास कारणीभूत संदेश उगमकर्त्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी, अशी विनंती महापालिका प्रशासनाने पोलिसांकडे केली आहे. अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांनी सहपोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे लेखी पत्राद्वारे ही विनंती केली आहे.२० जून रोजी मुंबई शहर आणि उपनगरांत मुसळधार वृष्टी होऊन सखल भागांमध्ये पाणी साचणे, घरे आणि झाडे कोसळणे इत्यादी बाबींचा सामना मुंबईकरांना करावा लागला. कुलाबा वेधशाळेने पुढील दोन दिवस मुंबई शहर आणि उपनगरांत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली होती. या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये साशंकतेचे वातावरण असतानाच अनाहूत व्यक्तीने संदेश तयार करुन व्हॉटसअ‍ॅपवर पसरवला. अरबी समुद्र्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे त्याचे रूपांतर चक्रीवादळात होऊन मुंबईत पुन्हा एकदा चक्रीवादळासारखी/२६ जुलै, २००५ सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते, या आशयाचा हा संदेश मुख्यत्वे व्हॉट्स अ‍ॅपद्वारे पसरविण्यात आला. हा संदेश मोठ्या प्रमाणावर पसरून नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. हा संदेश पसरविणाऱ्या संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध अत्यंत कडक कायदेशीर कार्यवाही करण्याचे निर्देश द्यावेत, अशी विनंती देशमुख यांनी केली आहे.