मुंबई : पोलीस हा समाजाचा एक प्रमुख भाग असून नागरिकांच्या रक्षणासाठी तो २४ तास कार्यरत असतो. त्यांच्याबाबत तक्रार असल्यास त्या मांडण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मात्र विनाकारण हुज्जत घालून त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही. अन्यथा जन्माची अद्दल घडेल, असा इशारा पोलीस महासंचालक सतीश माथुर यांनी बुधवारी दिला. माथुर यांनी पत्रकार परिषद घेऊन हल्लेखोरांना इशारा देतानाच पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन नागरिकांना केले. माथुर म्हणाले, विविध सणउत्सवांचा हा कालावधी असून काही समाजकटकांकडून ड्यूटी बजावत असलेल्या पोलिसांवर हल्ले होत आहेत. तथापि, ही बाब अत्यंत निषेधार्ह आहे. कायदा हातात घेऊन हे प्रश्न सुटणार नाही, उलट स्थिती अधिक बिघडू शकते.पोलीस कर्मचारी, अधिकाऱ्यांनी कसे वागावे, यासाठी उपआयुक्त/ अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. सध्याच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन यापुढेही त्यांचे समुपदेशन केले जाईल, असे माथुर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)राजकीय दबावाला बळी पडू नकापोलिसांवर राजकीय नेते, समाजाचे नेते व स्थानिक लोकप्रतिनिधींचा दबाव असल्याची बाब निदर्शनास आणली असता माथुर म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आपल्याला कोणत्याही दबावाला बळी न पडता कायदा हातात घेणाऱ्यांवर कठोर कारवाईचे लेखी आदेश दिले आहे. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी कोणताही दबाव न घेता योग्य कायदेशीर कारवाई करावी, त्याबाबत अडचणी येत असल्यास तत्काळ वरिष्ठांच्या निदर्शनास आणावे.कल्याण घटनेचा तपास गुन्हे शाखेकडून कल्याणमध्ये उपनिरीक्षकाला पाण्यात बुडवून मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर कठोर कारवाईची सूचना ठाण्याच्या आयुक्तांना केली आहे. याबाबत स्थानिक पोलीस व ठाणे गुन्हा अन्वेषण शाखेकडून तपास केला जात असल्याचे सतीश माथुर यांनी सांगितले.पोलिसांवरील हल्ल्याच्या ठळक घटनानरसिंग महापुरे (४५) नौपाडा वाहतूक शाखेचे हवालदार यांना तीनहातनाका येथे योगेश भांबरे (२९) या मद्यपी वाहनचालकाने गाडीने उडवले व फरफटत नेले.शशिकांत कालगुडे या शिवसेना शाखाप्रमुखाकडून वाहतूक शाखेच्या महिला हवालदाराला भररस्त्यात मारहाण व विनयभंग.आबासाहेब थोरात या वाहतूक शाखेच्या हवालदाराच्या अंगावर खारेगाव टोलनाका येथे ट्रक नेऊन चिरडलेविश्वास वालावलकर, नंदकुमार पाटील आणि कैलास बास्ते या तीन हवालदारांवर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींनी विटा फेकून त्यांना जखमी केले भिवंडीत बाबासाहेब बोराडे व अरुण बर्वे या दोन बीटमार्शलवर घरफोडी करणाऱ्या आरोपींनी चाकूहल्ला केला.भिवंडी येथील दंगलीत गांगुर्डे व जगताप या दोन पोलीस हवालदारांना दंगेखोरांनी जिवंत जाळले.१७ आॅगस्ट २०१६स्थळ : तुमसर (भंडारा)घटना : भंडाऱ्याचे आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केली पोलीस ठाण्यातच पोलीस कर्मचारी राजू साठवणे यांना मारहाण२३ आॅगस्ट २०१६स्थळ : मुंबईघटना - बाईकस्वाराने केलेल्या मारहाणीत वाहतूक पोलीस विलास शिंदे गंभीर जखमी. उपचारांदरम्यान मृत्यू.२ सप्टेंबर २०१६१) स्थळ : धुळेघटना -पोलीस उपनिरीक्षक प्रेमनाथ ढोले यांना जमावाकडून जबर मारहाण२) स्थळ : जालनाघटना - आमदार कुचे यांच्या दबावाला वैतागून निरीक्षक विद्यानंद काळे यांनी घेतला आत्महत्येचा निर्णय३ सप्टेंबर २०१६१) स्थळ : ठाणेघटना - एलबीएस रोडवर चारचाकी चालकाने वाहतूक पोलीस नरसिंग महापुरे यांना फरफटत नेले. यात महापुरे जखमी झाले. आरोपी योगेश भामरेला अटक२) स्थळ : अहमदनगर घटना - वाळू तस्करांची पोलिसांना मारहाण५ सप्टेंबर २०१६१) स्थळ : नंदुरबारघटना - गणेश चतुर्थी मिरवणुकीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान दोन गटांत हाणामारी झाली. मध्यस्थी करण्यास गेलेल्या पोलीस उपनिरीक्षक यादव सखाराम भदाणे यांना मारहाण करण्यात आली.२) स्थळ : पुणेघटना : कारचालकाने वाहतूक पोलिसाचा हाताला चावा.६ सप्टेंबर २०१६स्थळ : नाशिकघटना - रिक्षा अंगावर घालत पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न
हल्लेखोरांना जन्माची अद्दल घडवू - पोलीस महासंचालक
By admin | Updated: September 8, 2016 05:43 IST