शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘डान्सबार बंदीसाठी नव्याने कायदा करा’

By admin | Updated: December 2, 2015 03:32 IST

डान्सबार बंदीबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे भूमिका न मांडल्याने त्यावरील बंदी उठविण्यात आली आहे. मात्र त्याला राज्यातील जनतेचा असलेला विरोध लक्षात

मुंबई : डान्सबार बंदीबाबत राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात योग्य प्रकारे भूमिका न मांडल्याने त्यावरील बंदी उठविण्यात आली आहे. मात्र त्याला राज्यातील जनतेचा असलेला विरोध लक्षात घेऊन नवीन कायदा संमत करून येत्या हिवाळी अधिवेशनात सादर करण्यात यावा, अन्यथा त्याविरुद्ध राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेस, राष्ट्रवादी, शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने देण्यात आला आहे. मंगळवारी प्रेस क्लबमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या संघटनांनी ही भूमिका स्पष्ट केली. डान्सबार परवान्यासाठी ६० जणांच्या निवेदनपत्राचा निर्णय दोन आठवड्यात निकाली काढा, असे आदेश राज्य सरकारला दिलेले आहेत. त्याबाबत राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ म्हणाल्या, ‘युती सरकार डान्सबार मालकांच्या लॉबीपुढे झुकले आणि कोर्टात व्यवस्थित बाजू न मांडल्यामुळे बंदी उठविण्याचा दुर्दैवी निर्णय झाला. शेकापचे आमदार विवेक पाटील म्हणाले, ‘पुन्हा डान्सबार सुरू झाल्यास युवापिढी बरबाद होईल, सर्व घटकांतील नागरिकांना त्याचा फटका बसणार असल्याने त्याला आमचा तीव्र विरोध राहणार आहे. यासंदर्भात सरकारने अ‍ॅटर्नी जनरल यांच्याशी चर्चा करून येत्या हिवाळी अधिवेशनात नव्याने कायदा करावा, यासाठी आर.आर. पाटील फाउंडेशन कोर्टात गेले असल्याचेही फाउंडेशनचे विनोद पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)