शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

"आधी तिकीट बूक करा मग पैसे द्या"

By admin | Updated: May 31, 2017 20:34 IST

RCTC ने ‘बाय नाऊ, पे लेटर’ ही नवी सेवा सुरू केली आहे. या नव्या सेवेनुसार रेल्वेचं तिकीट बूक करुन नंतर पैसे देता येतील.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31- भारतीय रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन अर्थात IRCTC ने प्रवाशांसाठी नवा पर्याय आणला आहे. IRCTC ने ‘बाय नाऊ, पे लेटर’ ही नवी सेवा सुरू केली आहे.  या नव्या सेवेनुसार  रेल्वेचं तिकीट बूक करुन नंतर पैसे देता येतील. ई-पे लेटरच्या सहयोगाने IRCTC ने ही सुविधा सुरू केली आहे. महत्त्वाचं म्हणजे तिकीट बूक केल्यानंतर 14 दिवसात कधीही पेमेंट करता येणार आहे. यासाठी IRCTC च्या वेबसाईटवर जाऊन पेमेंट करावं लागेल. .‘बाय नाऊ, पे लेटर’ या नव्या सुविधेमुळे तिकीट बूक करताना अडथळा ठरणाऱ्या मोठ्या पेमेंट प्रोसेसपासून लोकांना सूट मिळणार आहे. 
 
IRCTC च्या ‘बाय नाऊ, पे लेटर’ सुविधेचा वापर करण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्डची माहिती द्यावी लागणार आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल. ओटीपी आल्यानंतर प्रवाशांना तिकीट बूक करता येणार आहे. यापूर्वी IRCTC ने तिकिटासाठी कॅश ऑन डिलीव्हरी सेवा सुरु केली आहे. तिकीट बूक केल्यानंतर तुम्ही ते घरी मागवू शकता. त्यानंतर पेमेंट कार्ड किंवा कॅशद्वारे करु शकता, अशी सुविधा होती. IRCTCमध्ये दिवसाला सहा लाख व्यवहार होतात. यापैकी पाच टक्के तरी व्यवहार पुढील सहा महिन्यात या नव्या सुविधेकडे आणण्याचा मानस आहे, असं इ-पे लेटरकडून सांगण्यात आलं आहे. 
 
"बाय नाऊ, पे लेटर" या सेवेशी ग्राहकाला जोडण्याआधी त्या ग्राहकाचे IRCTC बरोबर झालेले आधीचे व्यवहार तपासले जातील, असं इ-पे लेटरचे सह-संस्थापक अक्षत सक्सेना म्हणाले आहेत.

इ-पे लेटर या संस्थेची स्थापना डिसेंबर 2015 साली मुंबईत झाली होती.  आता ही संस्था IRCTC सह नवी सुविधा ग्राहकांसाठी घेऊन आली आहे.