शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

महाराष्ट्राला बनवू जगातील सर्वोत्कृष्ट राज्य

By admin | Updated: August 16, 2015 02:53 IST

राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. देशाच्या ६९व्या

- मुख्यमंत्र्यांचा निर्धार

मुंबई : राज्यातील सर्वच घटकांना सोबत घेऊन महाराष्ट्राला जगातील सर्वोत्कृष्ट राज्य बनविण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केला. देशाच्या ६९व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयातील ध्वजारोहणानंतर मुख्यमंत्री बोलत होते. उद्योगांसाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणत रोजगाराच्या संधी वाढवतानाच शेतकरीही जगला पाहिजे. त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना लागू करीत असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री म्हणाले की, विविध नैसर्गिक आपत्तींमुळे अन्नदाता असणारा शेतकरीच संकटात आहे. त्याला सावरण्यासाठी मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यांतील, तर विदर्भातील ६ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी अन्नसुरक्षा योजना लागू करण्यात येईल. यात शेतकऱ्यांना ३ रुपये किलोप्रमाणे तांदूळ, तर २ रुपये किलोने गहू उपलब्ध करुन दिला जाणार आहे. ७ लाख शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. संकटाच्या काळात बळीराजा उपाशी राहू नये, यासाठी ही योजना सुरु करीत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.पारदर्शक कारभारासाठी सरकारने खरेदीची नवी पध्दत स्विकारली आहे. तसेच लोकांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी शासनाने सेवा हमी विधेयकही संमत करण्यात आले आहे. ‘आपले सरकार’ या वेबपोर्टलवर आतापर्यंत १ लाख तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ८५ हजार तक्रारी निकाली काढण्यात आल्या. या वेबपोर्टलवर आता महसूली मुख्यालयांचाही समावेश केला जाणार असून आज त्याचा शुभारंभ होत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.मुख्यमंत्री म्हणाले की, वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी शासन प्रयत्नरत आहे. मुंबईतील इंदू मीलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यास केंद्र शासनाकडून जागा मिळाली आहे. बाबासाहेबांचे लंडनस्थित घर विकत घेण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. हे वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष आहे. शासन हे वर्ष ‘समता आणि समरसता वर्ष’ म्हणून साजरा करेल, असे ते म्हणाले.