शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘मेक इन इंडिया’ यशस्वी करणार

By admin | Updated: February 8, 2016 02:07 IST

‘‘उद्योग जर देशाबाहेर गेले तर ते आपल्या दृष्टीने चिंताजनक होईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली आहे.

लासुर्णे : ‘‘उद्योग जर देशाबाहेर गेले तर ते आपल्या दृष्टीने चिंताजनक होईल. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मेक इन इंडिया’ची घोषणा केली आहे. ही संकल्पना यशस्वी करण्यात येईल,’’ असे प्रतिपादन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी केले. गोखळी (ता. इंदापूर) येथे फडतरे उद्योग समूहाच्या माध्यमातून फडतरे फॅबटेक प्रा. लि.च्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माजी कृषिमंत्री शशिकांत सुतार, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार दत्तात्रय भरणे, बबनदादा शिंदे, प्रशांत परिचारक, साखर संघाचे अध्यक्ष शिवाजी नागवडे, सोनाई दूधचे अध्यक्ष दशरथ माने, पुणे जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, विठ्ठल शुगर कॉर्पोरेशनचे अध्यक्ष संजय शिंदे, माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे, फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रय फडतरे, हनुमंत फडतरे, मंगेश फडतरे आदी उपस्थित होते. गिते म्हणाले, की सध्या मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री अडचणीत आली आहे. उद्योगांची परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यातील उद्योगांचे दुसऱ्या राज्यात पलायन सुरू आहे. हे पलायन देशांतर्गत ठीक आहे. कारण उद्योग कोणत्याही राज्यात असला तरी आपल्या देशातच आहे. मात्र, देशाबाहेर उद्योग गेल्यास चिंतेची बाब आहे. तीन ते चार वर्षांपासून महाराष्ट्रात दुष्काळाचे सावट आहे. यामुळे शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. शेती व्यवसायातील रोजगार कमी झाले आहेत. यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून तरुणांनी कारखानदारी क्षेत्रात उतरावे. फडतरे नॉलेज सिटीचे अध्यक्ष उत्तम फडतरे म्हणाले, हा उद्योगसमूह सुरुवातीला शेती व्यवसायात उतरला. त्यानंतर शिक्षणापाठोपाठ उद्योग व आता अवजड उद्योग क्षेत्रात पदार्पण केले आहे. या उद्योगात चारशे ते पाचशे तरुणांना रोजगार मिळणार आहे. सूत्रसंचालन औदुंबर बुधावले यांनी केले. आभार अध्यक्ष मंगेश फडतरे यांनी मानले. > आजारी उद्योगातील कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाहीअवजड उद्योग खात्यात ३२ अवजड उद्योग येतात. त्यापैकी ११ उद्योग आजारी आहेत तर उर्वरित २१ उद्योगांची भरभराट होऊन फायदा होईल. या ११ आजारी उद्योगातील कामगारांना वाऱ्यावर सोडणार नाही. १९८७च्या नियमानुसार पगार मिळाला, त्याचप्रमाणे २००७ नियमानुसार ३५ ते ४० लाख रुपये देऊन सेवानिवृत्ती मिळणार आहे, असे आश्वासन केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांनी दिले.मंत्राशिवाय यंत्र सुरू करत नाहीमंत्राला शरण न जाता यंत्राला शरण गेले पाहिजे, असे मत सूत्रसंचालक औदुंबर बुधावले यांनी व्यक्त केले. त्यावर केंद्रीय मंत्री अनंत गिते म्हणाले, या मताशी आपण पूर्णपणे सहमत नाही. आपण मंत्रोच्चार केल्याशिवाय कोणतेही यंत्र सुरू होत नाही. कोणतेही मंत्र म्हटल्याशिवाय यंत्र सुरू करत नाही. त्यामागची भावना म्हत्त्वाची आहे.