शहरं
Join us  
Trending Stories
1
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
2
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
3
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
4
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
5
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
6
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
7
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
8
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
9
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
10
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
11
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
12
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
13
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?
14
"मी गावचा माणूस, मला इंग्रजी समजत नाही"; शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थिनीसमोर पकडले कान
15
तुम्हाला गुंतवणूकीचा ६०:४० चा नियम माहितीये? पैसे कमावण्याची आहे सोपी पद्धत, जाणून घ्या कसं?
16
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
17
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
18
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
19
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
20
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात

‘मेक इन इंडिया’ १३ फेब्रुवारीपासून

By admin | Updated: February 9, 2016 01:39 IST

जगातील ६० देशांचे उच्चपदस्थ प्रतिनिधी, मोठे गुंतवणूकदार, १५ केंद्रीय मंत्री यांच्यासह १७ राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांचा सहभाग असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्घाटन

मुंबई : जगातील ६० देशांचे उच्चपदस्थ प्रतिनिधी, मोठे गुंतवणूकदार, १५ केंद्रीय मंत्री यांच्यासह १७ राज्यांचे मुख्यमंत्री आणि मंत्री यांचा सहभाग असलेल्या ‘मेक इन इंडिया’ सप्ताहाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १३ फेब्रुवारीला मुंबईत होत आहे. १८ तारखेपर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात महाराष्ट्रासह देशाच्या विविध राज्यांमध्ये कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार होणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय वाणिज आणि व्यापार राज्यमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज पत्रकार परिषदेत या बाबत माहिती दिली. पंतप्रधान मोदी यांच्या मेक इन इंडिया संकल्पनेअंतर्गत हा पहिला सप्ताह आयोजित करण्याचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. त्याचे उद्घाटन बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) येथील ‘मेक इन इंडिया सेंटर’मध्ये होईल. उद्घाटनानंतर अनेक चर्चासत्रे, कार्यक्र म आणि उद्योग विश्वातील प्रतिनिधींबरोबर संवाद होणार आहे. विविध राज्यांची दालने असतील. देशांतर्गत कंपन्यांचे ८ हजार सीईओ सहभागी होतील. तब्बल २३ चर्चासत्र होणार आहेत. या सप्ताहानिमित्त गिरगाव चौपाटी येथे होणाऱ्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैशिष्ट्य, प्राचीन संस्कृती प्रदर्शित केली जाईल. ‘मेक इन इंडिया’ सेंटरमध्ये महाराष्ट्राचे वेगळे पॅव्हेलियन असणार आहे. त्यात महाराष्ट्राची परंपरा, पर्यटन क्षेत्रांची माहिती, सिनेमा थिएटर, आॅटोमोबाईल आणि स्मार्ट सिटी असे वेगवेगळे विभाग असतील. (विशेष प्रतिनिधी)‘मेक इन इंडिया सप्ताह’मध्ये महाराष्ट्राशी संबंधित कार्यक्रम १४ फेब्रुवारी -महाराष्ट्र इनोव्हेशन चर्चासत्रटेक्स्टाईल इंडस्ट्री इन महाराष्ट्र चर्चासत्रमहाराष्ट्र एमएसएमई चर्चासत्रमहाराष्ट्र नाईट१५ फेब्रुवारी -महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट चर्चासत्रमेक इन मुंबई चर्चासत्रनेव्ही बँड१६ फेब्रुवारी - दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरसंबंधी चर्चासत्रबिझनेस टू बिझनेस व बिझनेस टू गव्हर्नमेंट मिटींगसांस्कृतिक कार्यक्र म१७ फेब्रुवारी - बिझनेस टू बिझनेस व बिझनेस टू गव्हर्नमेंट बैठकमहाराष्ट्र टेक्स्टाईल सेमिनार