शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

भारीला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवा

By admin | Updated: August 26, 2015 03:18 IST

देशात सर्वत्र स्मार्ट सिटीची चर्चा सुरू आहे. त्याच धर्तीवर अधिकाऱ्यांनी आता सांसद आदर्श ग्राम असलेल्या भारीला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवावे, असे आवाहन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे

यवतमाळ : देशात सर्वत्र स्मार्ट सिटीची चर्चा सुरू आहे. त्याच धर्तीवर अधिकाऱ्यांनी आता सांसद आदर्श ग्राम असलेल्या भारीला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवावे, असे आवाहन लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सांसद आदर्श ग्राम भारीच्या विकासकामांचा आढावा मंगळवारी आयोजित बैठकीत घेतला गेला.देशाच्या विकासात गावांचे महत्त्व अधिक आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामीण विकासावर भर दिला आहे. सांसद आदर्श ग्राम योजना ही त्यांचीच संकल्पना आहे. या योजनेतील भारी या गावाचा सर्वांगीण विकास करायचा आहे. देशातील ‘मॉडेल व्हिलेज’ म्हणून भारीला नावारुपास आणायचे आहे. भारी गावाला पंतप्रधानांच्या स्वप्नातील आदर्श गाव बनविण्यासाठी अधिकाऱ्यांचे योगदान महत्वाचे आहे. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर अधिकाऱ्यांनी भारीला ‘स्मार्ट व्हिलेज’ बनविल्यास आपण पंतप्रधानांना या गावात आणू, अशी ग्वाही दर्डा यांनी दिली. आढावा बैठकीला माजी आमदार कीर्ती गांधी, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मल्लिनाथ कलशेट्टी, अरविंद पांडे, भारीचे सरपंच गणपतराव गाडेकर आदी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) विमानतळ विकासावरही चर्चा या बैठकीपूर्वी विजय दर्डा यांनी जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याशी त्यांच्या कक्षात विविध मुद्यांवर सखोल चर्चा केली. यवतमाळच्या जवाहरलाल दर्डा विमानतळाचा विकास, सहकारातील जिल्ह्णात एकमेव सुरू असलेली प्रियदर्शिनी सहकारी सूत गिरणी समोरील अडीअडचणी, महामार्ग-रेल्वे आणि विमान वाहतूक या दळणवळणाच्या सोई-सुविधा नसल्याने येथे उद्योग थाटण्यात निर्माण होणाऱ्या समस्या, शेतकरी-शेतमजुरांचे प्रश्न आदी मुद्दे या वेळी चर्चेत होते. शासनाने यवतमाळच्या विमानतळ विकासाचा रिलायन्ससोबत करार केला. मात्र रिलायन्स संथगतीने विकास करीत आहे. त्यामुळे हा करार रद्द करणे जिल्ह्णाच्या हिताचे राहील, असेही दर्डा यांनी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना सूचविले.