शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

गोवा भ्रष्टाचारमुक्त करू - अरविंद केजरीवाल

By admin | Updated: May 23, 2016 04:35 IST

गोवा विधानसभेची निवडणूक म्हणजे केवळ निवडणूक नाही, ते एक आंदोलन आहे. गोवा भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. गोव्यातील भाजपा सरकारने काँग्रेसची भ्रष्ट राजवटच पुढे चालू ठेवली आहे.

पणजी : गोवा विधानसभेची निवडणूक म्हणजे केवळ निवडणूक नाही, ते एक आंदोलन आहे. गोवा भ्रष्टाचारात बरबटलेला आहे. गोव्यातील भाजपा सरकारने काँग्रेसची भ्रष्ट राजवटच पुढे चालू ठेवली आहे. भ्रष्टाचार, कॅसिनो आणि खाणींच्या प्रश्नांबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवेकरांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी येथे केली.गोवा भ्रष्टाचारमुक्त करण्याची ग्वाही त्यांनी दिली. येथील कांपाल मैदानावर केजरीवाल यांची जाहीर सभा झाली. ‘आप’तर्फे सहा महिने येथे जोरदार प्रचार मोहीम राबवली जात आहे. ४० मतदारसंघांत आपचे उमेदवार उभे केले जातील, असे पक्षाने यापूर्वी जाहीर केलेले आहे. सर्व मतदारसंघांत पक्षाचे समन्वयक जाहीर झालेले आहेत. हेल्पलाइन क्रमांकही लोकांना देण्यात आलेला आहे. मतदारांच्या व्यक्तिगत गाठीभेटींवर पक्षाने भर दिलेला आहे. त्यासाठी दारोदार पक्षाचे कार्यकर्ते जात आहेत. या सर्वांचा परिणाम सभेच्या लक्षणीय उपस्थितीत जाणवला.केजरीवाल म्हणाले, दिल्ली निवडणुकीत ते माझी टिंगल करत नव्हते तर आम आदमीच्या ताकदीची टिंगल करत होते. या आम आदमीच्या मनात भ्रष्टाचाराच्या विरोधात असंतोष धगधगत होता. तो निकालातून दिसून आला, गोव्यातही हे होऊ शकते.स्वत:च्या मंत्र्याला लाच घेतली म्हणून नव्हे, तर लाच मागितली म्हणून आम्ही सीबीआयच्या स्वाधीन केले, देशाच्या इतिहासात हे प्रथमच घडले, असे त्यांनी सांगितले. सभेला महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.