शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘जेनेरिक’ची सक्ती औषध कंपन्यांवर करा

By admin | Updated: April 25, 2017 01:46 IST

डॉक्टरांनी जेनेरिक औषधे लिहून देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अपूर्ण असल्याचा आरोप ‘जन आरोग्य अभियान’ने केला आहे.

मुंबई : डॉक्टरांनी जेनेरिक औषधे लिहून देण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा निर्णय अपूर्ण असल्याचा आरोप ‘जन आरोग्य अभियान’ने केला आहे. याउलट, डॉक्टरांप्रमाणेच जेनेरिक औषधांची सक्ती औषध कंपन्यांवर करावी, अशी मागणी ‘जन आरोग्य अभियान’ने शासनाकडे केली आहे.जेनेरिक औषधे विकणे औषध कंपन्यांना बंधनकारक केले पाहिजे, कारण कोणतीच कंपनी असे करत नाही. त्यासाठी १९७५ साली हाथी समितीने शिफारस केल्याप्रमाणे आधी ब्रँड नावे टप्प्याटप्प्याने रद्द करायला हवीत. सुरुवातीला निदान जेनेरिक नावे ब्रँड नावापेक्षा मोठ्या ठळक अक्षरात छापायाचे बंधन तरी हवे, असेही ‘जन आरोग्य अभियान’चे म्हणणे आहे. एखादे औषध कमी दर्जाचे आढळले, तर त्या बॅचची सर्व औषधे देशभर रद्द करून परत बोलावली जाण्याची पद्धत नाही. कारण प्रत्येक राज्यातील ड्रग कंट्रोलर स्वतंत्र आहे. अनेक कंपन्या याचा गैरफायदा घेऊन एफडीएने नापास केलेली औषधे दुसऱ्या राज्यात विकतात, तसेच कमी दर्जाचे औषध सापडले, तरी उत्पादकावर केस दाखल केली जातेच असे नाही. याकडे अभियानाचे डॉ.अभिजीत मोरे यांनी लक्ष वेधले. देशातील बहुसंख्य औषधांवर पेटंट नसूनही आणि त्यांचा उत्पादन खर्चही अतिशय कमी असूनसुद्धा केवळ नफेखोरीमुळे ती महाग आहेत. औषधांच्या किमती कमी करायच्या असतील, तर सध्याचे किंमत नियंत्रणाचे धोरण बदलण्याची गरज अभियानाचे डॉ. अभय शुक्ला यांनी व्यक्त केली. कमाल किंमती ठरवण्यासाठी ‘उत्पादन-खर्चावर मार्जिन’ ही पद्धत वापरल्यास औषधांच्या किमती आजच्या एक चतुर्थांश होतील, असेही डॉ. शुक्ला यांनी नमूद केले. (प्रतिनिधी)