शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

एसीपीच्या बढतीसह फरकाची रक्कम द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2017 01:16 IST

सेवाज्येष्ठतेच्या आधारावर सहायक पोलीस आयुक्त पदाच्या (एससीपी) पदोन्नतीसाठी पात्र असतानाही जाणीवपूर्वक त्यापासून वंचित ठेवत अधिकाऱ्याला सेवानिवृत्त केल्याप्रकरणी

- जमीर काझी,  मुंबईसेवाज्येष्ठतेच्या आधारावर सहायक पोलीस आयुक्त पदाच्या (एससीपी) पदोन्नतीसाठी पात्र असतानाही जाणीवपूर्वक त्यापासून वंचित ठेवत अधिकाऱ्याला सेवानिवृत्त केल्याप्रकरणी महाराष्ट्र प्रशासकीय प्राधिकरणाने (मॅट) गृह विभाग, पोलीस महासंचालक व मुंबईच्या पोलीस आयुक्तांना फटकारले आहे. त्यांच्यावरील अन्याय दूर करीत बढतीसह त्याची मिळणारी सर्व फरकाची रक्कम तातडीने देण्याचे आदेश दिले आहेत. ‘मॅट’च्या या निर्णयामुळे गेल्या चार वर्षांपासून हक्कासाठी लढत असलेल्या वरिष्ठ निरीक्षक धनंजय बागायतकर यांना न्याय मिळाला आहे. उप अध्यक्ष राजीव अग्रवाल व सदस्य आर.बी. मलिक यांनी नुकतेच त्याबाबतचे आदेश दिलेले आहेत. बागायतकर बढतीच्या प्रतीक्षेत सप्टेंबर २०१५मध्ये निवृत्त झाले आहेत. बागायतकर हे नेहरूनगर पोलीस ठाण्यात वरिष्ठ निरीक्षक म्हणून कार्यरत असताना १० एप्रिल २०१४ रोजी एका वृत्तवाहिनीने हद्दीतील एका बिल्डरकडून काही पोलीस पैसे घेत असल्याचे चित्रण प्रसारित केले होते. या प्रकरणी बागायतकर यांना जबाबदार धरून निलंबित करण्यात आले. मात्र या प्रकरणी चौकशीत त्यांचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झाल्याने ‘मॅट’ने त्यांचे निलंबन रद्द करीत सेवेत घेण्याचे आदेश दिले. याबाबतच्या विभागीय चौकशीमध्ये त्यांना एक वर्षाची वेतनवाढ रोखण्यात आली. बागायतकर यांनी या निर्णयाला आव्हान दिल्याने त्यांची कोणत्याही पोलीस ठाण्यात नियुक्ती न करता सशस्त्र दल (एलए-१)मध्ये सहायक निरीक्षकासाठी असलेल्या पदाच्या विभागात बदली केली. त्याचप्रमाणे एसीपीच्या बढतीसाठी पात्र असतानाही डावलल्याने सप्टेंबर २०१५मध्ये निवृत्त झाले. आपल्याविरुद्धच्या अन्यायाबाबत त्यांनी ‘मॅट’मध्ये धाव घेतली होती. दावा दाखल करणारआपल्याकडून कसलेही गैरकृत्य झाले नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतरही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक ‘एपीआय’च्या पोस्टच्या ठिकाणी नियुक्ती केली. एसीपीच्या पदोन्नतीपासून डावलल्याने नाचक्की व मानसिक त्रास झाला आहे. त्यामुळे अब्रूनुकसानीसाठी संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे धनंजय बागायतकर यांनी सांगितले.