शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दुर्घटनेची सखोल चौकशी करा

By admin | Updated: May 11, 2015 03:14 IST

आगीत मुंबई अग्निशमन दलाचे २ अधिकारी शहीद, २ अधिकारी गंभीर जखमी व १ अग्निशमन किरकोळ जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी चौकशी समिती नेमली आहे.

मुंबई : आगीत मुंबई अग्निशमन दलाचे २ अधिकारी शहीद, २ अधिकारी गंभीर जखमी व १ अग्निशमन किरकोळ जखमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अजय मेहता यांनी या घटनेची चौकशी करण्याकरिता समिती स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती घटनेचा अहवाल तीन आठवड्यांत आयुक्तांना सादर करणार आहे.आग लागण्याचे कारण व आगीची माहिती मिळाल्यानंतर देण्यात आलेला प्रतिसाद, आग विझवताना आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्रीची उपलब्धता कार्यान्वित करण्याच्या व्यवस्थेबाबतची माहिती, आगीबाबतची माहिती वेळेत विविध यंत्रणा तसेच प्रसारमाध्यमे इत्यादींना उपलब्ध करणे या मुद्द्यांची समिती चौकशी करेल. त्यानंतर आपला अहवाल आयुक्तांना सादर करेल. (प्रतिनिधी) ------------राज्य सरकार कुटुंबीयांच्या पाठीशी काळबादेवी येथील आगीच्या दुर्घटनेत अग्निशमन दलाचे दोन जवान शहीद झाल्यानंतर या भीषण आगीची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका आयुक्त अजय मेहता यांना दिले आहेत. शिवाय जवानांच्या कुटुंबीयांना सर्व मदत करण्याची ग्वाही देतानाच देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेची गंभीर दखल घेत या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. राज्य सरकार जवानांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असेही ते म्हणाले.