शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

औषध घोटाळ्याची सखोल चौकशी करा

By admin | Updated: June 30, 2016 04:35 IST

लोकमतने उघडकीस आणलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील औषध घोटाळ्याची सखोल चौकशी करुन अंतिम अहवाल द्यावा

अतुल कुलकर्णी,

मुंबई- लोकमतने उघडकीस आणलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागातील औषध घोटाळ्याची सखोल चौकशी करुन अंतिम अहवाल द्यावा, असे सांगत अतिरीक्त मुख्य सचिव भगवान सहाय यांनी दिलेला अंतरिम अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला आहे. या प्रकरणात आणखी खोलात जाऊन चौकशी करण्याची गरज असल्यानेच आपण सहाय यांना अंतरीम अहवाल न देता पूर्ण अहवाल द्यावा असे सांगितल्याचे फडणवीस यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.औषध खरेदी घोटाळ्याची चौकशी करत असलेल्या सहाय यांच्या समितीने काही अधिकाऱ्यांना क्लीनचिट दिल्याचे तर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशीत सहकार्य केले नसल्याचे वृत्त काही वृत्तपत्रांनी प्रसिद्ध केले आहे. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, या बातम्या खोट्या आहेत. त्यात तथ्य नाही. सहाय यांनी अंतरिम अहवाल देऊ केला होता. पण तो अहवाल घेऊन पुढे काय करणार? संपूर्ण चौकशी करण्यासाठी त्यांना नेमले आहे. त्यामुळे त्यांनी सगळ्या प्रकाराची पूर्ण चौकशी करुनच अहवाल द्यावा असे त्यांना सांगण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.दरम्यान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सहाय यांच्या समितीला विधीमंडळात केलेल्या भाषणाची प्रत पाठवली असून जे मुद्दे भाषणात मांडता आले नाहीत, त्याची वेगळी यादी चौकशी समितीकडे पाठवल्याचे सांगितले. याबाबत सहाय यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आपल्याला मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण चौकशी करण्याविषयी सांगितले आहे. आपण चौकशी करुन अहवाल सादर करु. या प्रकरणी सचिवांची काही जबाबदारी नाही का? असा सूर काहींनी लावल्याने सचिव सुजाता सौनिक यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून माहिती देण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.