शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कलाकारांचे जगणे सुसह्य करा

By admin | Updated: April 22, 2017 01:25 IST

उमेदीच्या काळात कलाकारांना सगळेच डोक्यावर घेतात. असेच लक्ष त्याच्या निवृत्ती काळातही दिले पाहिजे. निवृत्त कलावंतांना आज दिवसाला केवळ ७० रुपये पेन्शन मिळते.

- विशाल सोनटक्के, सुलभा देशपांडे नाट्यनगरी (उस्मानाबाद)

उमेदीच्या काळात कलाकारांना सगळेच डोक्यावर घेतात. असेच लक्ष त्याच्या निवृत्ती काळातही दिले पाहिजे. निवृत्त कलावंतांना आज दिवसाला केवळ ७० रुपये पेन्शन मिळते. त्यात नेमके त्यांनी कसे जगायचे, हा प्रश्न सरकारला का पडत नाही, असा सवाल करीत सन्मानाबरोबरच कलाकाराचे जगणे सुसह्य व्हावे याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जयंत सावरकर यांनी केली. तुळजाभवानी क्रीडा संकुलावर उभारण्यात आलेल्या सुलभा देशपांडे नाट्यनगरीत पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांच्या हस्ते मोठ्या धुमधडाक्यात ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन झाले. नाट्यचळवळीला खऱ्या अर्थाने गती मिळावी, असे वाटत असेल तर पुण्या-मुंबईबरोबरच ग्रामीण भागातील नाट्यगृहांची सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मत सावरकर यांनी व्यक्त केले. रणरणत्या उन्हात अभूतपूर्व प्रतिसाद... काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ हून अधिक आहे. मात्र, अशा रणरणत्या उन्हातही संमेलनाला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबाबत अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांनी उस्मानाबादकरांचे कौतुक केले. पुढील दोन दिवसात तीनही रंगमंचांवर कार्यक्रमांची लयलूट असणार आहे. या कार्यक्रमांना असाच प्रतिसाद मिळावा, अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या.दिंडीने दुमदुमली नाट्यनगरी...अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या उद्घाटनापूर्वी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उस्मानाबाद शहरातील कसबाराम मंदिरापासून संमेलनाचे स्वागताध्यक्ष आ. सुजितसिंह ठाकूर, नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते नाट्य दिंडीस प्रारंभ झाला. दिंडीतील सहभागी नाट्यप्रेमी, विद्यार्थ्यांच्या जयघोषणाने उस्मानाबादनगरी अक्षरश: दुमदुमून गेली.