शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जम्मु-काश्मिरच्या बंदीपोराजवळ शहीद झालेले मिलिंद यांचा २६/११चा अतिरेकी हल्ला उलथवून लावण्यामध्ये मोठे योगदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 20:30 IST

१६ डिसेंबर २००२ साली वायू दलात भरती झालेले मिलिंद यांचे शालेय वयापासून देशसेवेचे लक्ष्य ठेवले होते. साक्री येथे बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर धुळ्यातील विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असतानाच त्यांना सैन्यदलात जाण्याची संधी लाभली होती.

ठळक मुद्देसुरूवातीला सैन्याचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षणाबरोबरच मिलिंद यांनी तीन वर्षे पॅरा सैन्य, एनएसजी कमांडो असे सर्व प्रशिक्षण घेतले होते. २००४ साली वायू दलाने ‘गरूड कमांडो पथका’ची स्थापना केली. ‘गरूडा’ कमांडो पथकाच्या पहिल्या सत्राचे जवान म्हणून मिलिंद यांना कर्तबगारी दाखविण्याची संधी मिळाली होती. २६/११चा मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रसंगी अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यासाठी गरूड कमांडो या विशेष पथकाच्या जवानांनी योगदान दिले होते. मिलिंद यांचाही ‘गरूड कमांडो’च्या तुकडीत सहभाग होता

अझहर शेख / नाशिक : जम्मु-काश्मिरच्या बंदीपोराजवळील हाजीन सेक्टरमध्ये ‘जैश’च्या अतिरेक्यांना यमसदनी धाडताना वीरमरण आलेले मुळ धुळे येथील बोराळा गावाचे सुपुत्र व वायू दलाच्या ‘गरूडा’ पथकाचे कमांडो सार्जन्ट मिलिंद किशोर खैरनार यांनी मुंबईवर झालेल्या २६/११चा अतिरेकी हल्ला उलथवून लावण्यामध्ये मोठे योगदान दिले होते.धुळे जिल्ह्यातील साक्रीमध्ये शहीद मिलिंद यांचे बालपण गेले. त्यांनी शालेय शिक्षण तेथे पुर्ण केले. १६ डिसेंबर २००२ साली वायू दलात भरती झालेले मिलिंद यांचे शालेय वयापासून देशसेवेचे लक्ष्य ठेवले होते. साक्री येथे बारावी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर धुळ्यातील विज्ञान शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत असतानाच त्यांना सैन्यदलात जाण्याची संधी लाभली होती. सुरूवातीला सैन्याचे नऊ महिन्यांचे प्रशिक्षणाबरोबरच मिलिंद यांनी तीन वर्षे पॅरा सैन्य, एनएसजी कमांडो असे सर्व प्रशिक्षण घेतले होते. २००४ साली वायू दलाने ‘गरूड कमांडो पथका’ची स्थापना केली. ‘गरूड’ कमांडो पथकाच्या पहिल्या सत्राचे जवान म्हणून मिलिंद यांना कर्तबगारी दाखविण्याची संधी मिळाली होती. २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ल्याप्रसंगी अतिरेक्यांना कंठस्नान घालण्यासाठी राष्टÑीय सुरूक्षा दल (एनएसजी) गरूड कमांडो या विशेष पथकाच्या जवानांनी योगदान दिले होते. यावेळी मिलिंद यांनाही ‘गरूड कमांडो’च्या तुकडीत मुंबईवर झालेल्या अतिरेकी हल्ला उधळण्यासाठी रवाना रवाना करण्यात आले होते. नरीमन हाऊस येथे हेलिकॉप्टरद्वारे उतरणाºया भारतीय सैन्य दलाच्या विविध विशेष कमांडो पथकांच्या जवानांमध्ये मिलिंद यांचाही सहभाग होता, अशी माहिती वीरपिता किशोर खैरनार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

अतिरेक्यांशी झुंज देण्याची मिलिंद यांची  पहिली वेळ नव्हतीजम्मूच्या बंदीपोरामधील हाजीन सेक्टरमध्ये अतिरेक्यांशी झुंज देण्याची मिलिंद यांची ही पहिली वेळ नव्हती तर भारतीय वायू दलात दाखल झाल्यानंतर दोन वर्षांमध्येच त्यांनी मुंबईवरील २६/११च्या हल्ल्यात अतिरेक्यांना कंठस्नान घालत हल्ला उलथवून लावण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेली होते. हाजीनमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यानंतर चकमकीत उर्वरित दहशतवाद्यांना यमसदनी धाडताना ते शहीद झाल्याचे त्यांचे शालेय जीवनाचे मित्र राजकुमार राजकुवर यांनी सांगितले.