शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी कर्मचा-यांना कायम करणार,  नगरपालिका कर्मचा-यांच्या सातव्या वेतन आयोगाबाबत सकारात्मक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 02:18 IST

राज्यतील नगर पालिकांमधील रोजंदारी कर्मचाºयांना विविध नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वीस वर्षांपासूनचा प्रश्न निकाली काढला.

- विशेष प्रतिनिधी ।मुंबई : राज्यतील नगर पालिकांमधील रोजंदारी कर्मचाºयांना विविध नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज वीस वर्षांपासूनचा प्रश्न निकाली काढला. तसेच नगरपालिकेतील कर्मचाºयांना सातवा वेतन आयोग देण्यासंदर्भात राज्य शासन सकारात्मक विचार करणार असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.या कर्मचाºयांच्या विविध मागण्यासंदर्भात आज मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, नगरपरिषद संचालनालयाचे संचालक विरेंद्र सिंह यांच्यासह राज्य नगरपरिषद कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष विश्वानाथ घुगे, सरचिटणीस रामेश्वर वाघमारे, मुख्याधिकारी संघटनेचे सरचिटणीस सुधीर राऊत, संगीता ढोके, म्युनसिपल एप्लॉईज संघटनेचे कार्याध्यक्ष संतोष पवार, रोजंदारी कृती समितीचे किरण आहेर, सुरेश दानापुरे आदी उपस्थित होते.नगरपालिकांमध्ये २० वर्षांहून अधिक काळ रोजंदारी कर्मचारी काम करत आहेत. आजच्या निर्णयानुसार त्यापैकी सन १९९३ ते २००० या कालावधीतील रोजंदारी कर्मचाºयांना विविध नगरपालिकांमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे. तसेच नगरपरिषद कर्मचाºयांच्या सातव्या वेतन आयोगाचा प्रस्ताव के.पी. बक्षी समितीकडे पाठविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.नगरपालिका कर्मचारी आणि त्यांच्या संघटनांनी करवसुलीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. या कर्मचाºयांना वेतनासाठी सहायक अनुदान देणे, आश्वासित प्रगती योजनेचा लाभ, मुख्याधिकाºयांच्या संवर्गासंदर्भातील प्रश्नांवर सकारात्मक विचार करण्यात येईल. ग्रामपंचायतीमधील कर्मचाºयांना नगर परिषदांमध्ये समाविष्ट करण्यासाठी आराखडा तयार करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस