शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतरित विद्यार्थ्यांना आणणार मुख्य प्रवाहात

By admin | Updated: October 5, 2015 03:40 IST

ऊसतोडणी कामगाराच्या विजय या मुलाचे इयत्ता पाचवीचे शिक्षण सुरू असतानाच कुटुंबाने सोलापुरातून सांगलीत स्थलांतर केले. विजयचे शिक्षणमध्येच थांबले...

संदीप प्रधान, मुंबईऊसतोडणी कामगाराच्या विजय या मुलाचे इयत्ता पाचवीचे शिक्षण सुरू असतानाच कुटुंबाने सोलापुरातून सांगलीत स्थलांतर केले. विजयचे शिक्षणमध्येच थांबले... वीटभट्टीत दिवसरात्र राबणाऱ्या कुटुंबातील सुमन चौथीत असताना कुटुंबाने पोटापाण्याकरिता शहराकडे जाण्याचा निर्णय घेतला. सुमनची शिक्षणाची हौस तेथेच संपली... अशा सुमारे ७० हजार स्थलांतरित मुला-मुलींचे शिक्षण मध्येच थांबू नये याकरिता त्यांना ‘शिक्षण हमीपत्र’ देऊन त्यांचे सॉफ्टवेअरद्वारे ट्रॅकिंग करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची योजना अंमलात येऊ घातली आहे.शिक्षण हक्क कायद्यात स्थलांतरितांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडण्याचा मोठा अडसर असल्याने ऊसतोडणी कामगार, वीजभट्टी कामगार, दगड-खाण कामगार, बांधकाम मजूर अशा किमान आठ प्रकारच्या मोलमजुरीकरिता पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरणाऱ्यांच्या मुलांचे सरकारने सर्वेक्षण केले. अशा कुटुंबातील शाळेत जाण्यायोग्य मुला-मुलींची संख्या ७० हजारांच्या घरात आहे. स्थलांतरित मुलांची नोंदणी करून त्यांना ‘शिक्षण हमीपत्र’ देण्यात येणार आहे. ज्याची नोंद सरकारकडील एका सॉफ्टवेअरवर असेल. एखाद्या विद्यार्थी-विद्यार्थिनीच्या पालकांनी स्थलांतर केले व त्याचे शिक्षण थांबले तर लागलीच ते ज्या शाळेत जात होते त्या शाळेच्या मुख्याध्यापकांनी तशी नोंदणी करून सरकारला माहिती द्यायची आहे. विशिष्ट विद्यार्थी अथवा विद्यार्थिनी कुठे स्थलांतरित झाली ते ट्रॅकिंगद्वारे शोधून काढले जाईल. असा स्थलांतरित विद्यार्थी पुन्हा शाळेत आणणे ही तो वास्तव्य करीत असलेल्या ठिकाणी असलेल्या शाळेतील मुख्याध्यापकाची जबाबदारी असेल. त्या विद्यार्थ्याचे पालक ज्या कंत्राटदाराकडे काम करीत असतील त्याचा क्रमांक मुख्याध्यापकांना देऊन विद्यार्थ्याला शाळेत आणण्याकरिता प्रयत्न केले जातील, अशी माहिती राज्याचे शिक्षण सचिव नंदकुमार यांनी दिली.अनेकदा स्थलांतर करताना अशी कागदपत्रे या कुटुंबाकडून गहाळ झाल्याने त्यांच्या मुलांना शाळेत पुढील इयत्तेत प्रवेश मिळत नव्हता. शिक्षण हमीपत्र दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याची माहिती संगणकात नोंदली गेलेली असल्याने राज्यात कुठेही बसून त्याची पडताळणी करता येणार आहे.