शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसह ग्रामीण विकास हाच शासनाचा मुख्य अजेंडा- फडणवीस

By admin | Updated: July 3, 2017 22:28 IST

विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदलण्याची सुरुवात झाली आहे.

ऑनलाइन लोकमतपंढरपूर दि. 3 - विविध योजनांच्या माध्यमातून महाराष्ट्राला बदलण्याची सुरुवात झाली आहे. हागणदारीमुक्तीत महाराष्ट्र देशात अव्वल असून, शेतकऱ्यांसह ग्रामीण विकास हाच शासनाचा मुख्य अजेंडा असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले. स्वच्छता दिंडी 2017चा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. यानिमित्त येथील पंचायत समितीच्या आवारात आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते.यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, कृषी आणि पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, आमदार प्रशांत परिचारक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वच्छता दिंडीचा गेल्या बारा वर्षांपासून सुंदर उपक्रम सुरू आहे. या दिंडीच्या माध्यमातून राज्यभरातील वारकऱ्यांच्यात जनजागृती होते. या स्वच्छता दिंडीत सहभागी असणाऱ्या कलाकारांचे काम प्रभावी आहे. दिंडीचा उपक्रम स्तुत्य असून याची व्याप्ती वाढण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून गावोगावी जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जावेत. पंढरपूर तालुका हागणदारीमुक्त झाल्याचा विशेष आनंद आहे. निर्मलता आणि स्वच्छतेच्या ठिकाणीच ईश्वराचा वास असतो. त्यामुळे स्वच्छतेचे काम महत्वाचे आहे. भविष्यात पालखी सोहळ्यातील विसाव्याच्या ठिकाणी कायमस्वरूपी स्वच्छतागृहे उभारण्याचा सरकारचा मानस आहे. हागणदारी मुक्तीत राज्याची उत्तम काम झाले असून महाराष्ट्र देशात अव्वल आहे. स्वच्छ भारत करण्याचे प्रधानमंत्री मोदींचे स्वप्न या माध्यमातून पूर्ण होत आहे.शौचालय निर्मिती हे रोजगार निर्मितीचेही साधन आहे. गेल्या दोन वर्षात राज्यातील ११ जिल्हे, १५५ तालुके आणि १६ हजार ९४५ ग्रामपंचायती हागणदारी मुक्त झाल्या आहेत. शौचालयाच्या निर्मितीमुळे संबंधित कुटुंबांचा आरोग्यावरील मोठा खर्च कमी होतो. गेल्या दोन वर्षात ४० लाख नवीन शौचालये राज्यात बांधण्यात आली आहेत. या बरोबरच आपल्याला प्रधानमंत्र्यांचे भारत बेघर मुक्त करण्याचे स्वप्न साकारायचे आहे. त्यासाठी सर्वांनी तयार राहणायचे आवाहन देवेंद्र फडणवीस यावेळी केले. बबनराव लोणीकर म्हणाले, २०१८ पर्यंत महाराष्ट्र हागणदारी मुक्त करण्याचा शासनाचा संकल्प आहे. त्यासाठी शासनच्यावतीने विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. स्वच्छतेच्या बाबतीत देशात अव्वल असणारा महाराष्ट्र आपल्याला कायमच अग्रेसर ठेवायचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी विजयकुमार देशमुख, सदाभाऊ खोत यांची भाषणे झाली. स्वच्छता दिंडीत प्रबोधनाचे काम करणाऱ्या कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच शौचालयाच्या आदर्श प्रतिकृतीचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.