शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य आरोपीस बिहारमध्ये अटक

By admin | Updated: June 29, 2016 02:51 IST

लीलाबाई दुधकर(६०) व कमलाबाई दुधकर (७०) या महिलांच्या हत्येप्रकरणी नंदकुमार मनोजकुमार साव (२३)या मुख्य आरोपीला अखेर कोळसेवाडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली.

डोंबिवली : कल्याण पूर्वेत रहात असलेल्या लीलाबाई दुधकर(६०) व कमलाबाई दुधकर (७०) या महिलांच्या हत्येप्रकरणी नंदकुमार मनोजकुमार साव (२३)या मुख्य आरोपीला अखेर कोळसेवाडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली. कल्याण न्यायालयाने त्याला आज ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.शनिवारी १८ जून रोजी रात्री कल्याण पूर्वेकडील खडेगोळवली परिसरातील गावदेवी मंदिरानजीक असलेल्या दुधकर निवास येथे राहणाऱ्या लीलाबाई व कमलाबाई या नणंद-भावजयच्या डोक्यात काठी मारून त्यांना ठार करण्यात आले. घरातील दोन कॅमेरे, सोन्याचे दागिने व १० हजारांची रोकड असा सुमारे ३ लाखांचा मुद्देमाल घेऊन मारेकरी पसार झाले होते. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी बिहार येथील अरवल गाव गाठले. त्याठिकाणी आरोपी नंदकुमार याच्याकडून चोरीतील दागिने व रोकड असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. मात्र नंदकुमार सापडला नव्हता. आरोपीला आश्रय देणे आणि गुन्ह्याच्या मालाची विल्हेवाट लावणे या आरोपाखाली नंदकुमारचे वडील मनोजकुमार साव (५९) याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक करून मुंबईला आणले. ही बाब मुलगा नंदकुमार याला समजताच त्याने शुक्र वारी २४ जून रोजी बिहार येथील अरवल पोलीस ठाण्यात जावून स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले व गुन्ह्याची कबुली दिली. माझ्या वडलांचा यामध्ये दोष नसून त्यांना सोडा,अशी विनवणी तो पोलिसांकडे करू लागला. आपण येथे येण्यापूर्वीच विष प्राशन केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. लागलीच पोलिसांनी नंदकुमारला तेथील सरकारी रु ग्णालयात दाखल केले. २७ जून रोजी सकाळी तेथील डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज देताच कल्याण पोलिसांच्या पथकाने दुपारी साडेबारा वाजता अटक करून मंगळवारी सकाळी मुंबई कल्याण येथे आणले. मंगळवारी सकाळी कल्याण न्यायालयाने त्याला ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. (प्रतिनिधी)