शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्य सूत्रधारासह दोघांना अटक

By admin | Updated: July 15, 2015 00:44 IST

बनावट नोटा : आणखी एकाचे नाव निष्पन्न

सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीच्या मुख्य सूत्रधारासह दोघांना मंगळवारी सकाळी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. मुख्य सूत्रधार प्रवीण चिंतामणी कांबळे (वय ३५, रा. दुधगाव, ता. मिरज) व आप्पासाहेब कृष्णा घोरपडे (४६, दत्तवाड, ता. शिरोळ) अशी त्यांची नावे आहेत. अटकेतील संशयितांची संख्या दहा झाली आहे. याप्रकरणी आणखी एकाचे नाव निष्पन्न झाले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी पत्रकार परिषदेत दिली.फुलारी म्हणाले की, या प्रकरणात प्रवीण कांबळे मुख्य संशयित आहे. बनावट नोटांची छपाईची कल्पना त्याचीच आहे. त्याने यापूर्वी संगणकावर स्वत: एक हजाराच्या नोटेचे डिझाईन तयार करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्याला यश आले नव्हते. आप्पासाहेब घोरपडे हा पतसंस्थेत बचत प्रतिनिधी आहे. प्रवीणने त्याच्या मदतीने बनावट नोटा चलनात आणण्याचा बेत आखला होता. यासाठी त्याला सहभागी करून घेतले होते. यापूर्वी अटक केलेला रमेश घोरपडे हा आप्पासाहेबचा भाऊ आहे. त्याच्याच घरात बनावट नोटा छपाईचा कारखाना उघडण्यात आला होता. (प्रतिनिधी)पुण्यातून खरेदीपोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट म्हणाले की, बनावट नोटांची छपाई करण्यासाठी लागणारे रंगीत झेरॉक्स यंत्र, स्कॅनर, प्रिंटर, कागद ही सामग्री संशयितांनी पुण्यातून खरेदी केल्याचे स्पष्ट झाले आहे. कटिंग यंत्र कोरेगाव (ता. वाळवा) येथून खरेदी केले आहे. ते जुने आहे. यासाठी तीन ते साडेतीन लाख रुपये त्यांनी खर्च केले होते.