शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

माटुंगा स्थानकात ‘महिलाराज’

By admin | Updated: June 3, 2017 03:32 IST

देशात महिला सक्षमीकरणाबाबतच्या धोरणांमध्ये सकारात्मक बदल सुरू आहेत. मात्र मध्य रेल्वेने प्रत्यक्ष कृतीमधून महिला सक्षमीकरणाचा

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशात महिला सक्षमीकरणाबाबतच्या धोरणांमध्ये सकारात्मक बदल सुरू आहेत. मात्र मध्य रेल्वेने प्रत्यक्ष कृतीमधून महिला सक्षमीकरणाचा नवा पायंडा घातला आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकातील सर्व कामकाजासाठी महिला कर्मचारी आणि अधिकारी वर्गाची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानकाच्या सुरक्षेसाठीही रेल्वे सुरक्षा बलाच्या महिलांची नियुक्ती करण्यात आली आहे.मध्य रेल्वेच्या माटुंगा स्थानकात ४ फलाट आहेत. माटुंगा स्थानकातील सर्व कामकाज ३० महिला अधिकारी-कर्मचारी एकत्रितपणे चालवत आहेत. यात महिला स्टेशन मास्तरसह ११ बुकिंग क्लार्क, ७ तिकीट तपासनीस, २ मुख्य बुकिंग पर्यवेक्षक, २ उद्घोषणा करणाऱ्या महिला कर्मचारी आणि अन्य कामांसाठी ५ कर्मचारी यांचा समावेश आहे. महिलांच्या सुरक्षिततेसाठी ५ महिला अधिकारी-कर्मचारी रेल्वे सुरक्षा बलाच्या वतीने तैनात करण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे सुरक्षा बलाचे सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांनी दिली.महिला सक्षमीकरणासाठी मध्य रेल्वेच्या वतीने नेहमी अत्याधुनिक प्रयोग करण्यात येतात. त्या धर्तीवर माटुंगा स्थानक महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. प्रवाशांकडूनदेखील या उपक्रमाबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. माटुंगा स्थानकाप्रमाणे भविष्यात महिला सक्षमीकरणासाठी मध्य रेल्वे आणखी प्रयत्नकरणार आहे, असे मध्य रेल्वेचे नवनियुक्त मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.मध्य रेल्वेच्या महिला सक्षमीकरणाचा इतिहासपहिली महिला महाव्यवस्थापक सौम्या राघवन (१९७३ बॅच रेल्वे आॅफिसर) या मध्य रेल्वेवर महाव्यवस्थापकीय म्हणून कार्यभार सांभाळणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. २००७ साली व्ही.के. कौल यांच्या जागी राघवन यांची नियुक्ती करण्यात आली होती. पहिली महिला  स्टेशन मास्टर मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकात १९ मे १९९२ रोजी ममता कुलकर्णी यांची साहाय्यक स्टेशन मास्तर पदी नियुक्ती करण्यात आली होती. कुलकर्णी या पहिल्या स्टेशन मास्तर म्हणून ओळखल्या जातात. पहिली महिला गार्ड श्वेता गोने यांच्यावर वयाच्या २२व्या वर्षी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात रेल्वे गार्ड ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. वाणिज्य शाखेत पदवीधर असणाऱ्या श्वेता यांनी यशस्वीपणे मालगाडी गार्डची भूमिका पार पाडली आहे.