शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धीसह शरीर मजबुतीसाठी खेळ आवश्यक- महेश मांजरेकर

By admin | Updated: January 22, 2017 17:53 IST

प्रत्येक माणसाने खेळ हा खेळलाच पाहिजे. बुद्धीसोबत शरीर मजबूत राहणेही तितकेच गरजेचे आहे.

ऑनलाइन लोकमत/सुधीर राणे

कणकवली, दि. 22 - प्रत्येक माणसाने खेळ हा खेळलाच पाहिजे. बुद्धीसोबत शरीर मजबूत राहणेही तितकेच गरजेचे आहे. खेळाचा त्यासाठी निश्चितच उपयोग होतो. त्यामुळे या स्पर्धेत खिलाडूवृत्तीने खेळ करा आणि सर्वाना आनंद द्या, असे आवाहन सिने दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी येथे केले.बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने येथील मुडेश्वर मैदानावर आयोजित राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेचे उदघाट्न रविवारी झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अभिनेता आकाश ठोसर, बाजारपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा युवा नेते संदेश पारकर, आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक रूपेश नार्वेकर, सुशांत नाईक, सुमेधा अंधारी, नीलम पालव, महेश सावंत, संतोष पुजारी, गौरव हर्णे, आदित्य सापळे, चेतन मुंज, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष महेश गवस, मालवण उपनगराध्यक्ष राजन वराडकर, विजय नेमळेकर, दीपक सांडव, महेश पटेल, अभिजीत शेलार आदी उपस्थित होते.महेश मांजरेकर म्हणाले, मी कोकणातला आहे. माझे गाव जैतापूर हे आहे. त्यामुळे कोकण माझ्या आवडीचा आहे. येथे येण्याची संधी मी कधी सोडत नाही. क्रिकेट हा खेळ मला आवडतो. पुढच्या वर्षी संधी मिळाल्यास या स्पर्धेत माझा संघ मी निश्चितच खेळवीन आणि विजयी देखील होईन. या स्पर्धेचा चषक खूप मोठा आहे. विजयी संघाचा कप्तान या चषकात बसून घरी जातो का? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संदेश पारकर म्हणाले, क्रिकेटचा प्रचार आणि प्रसार ग्रामीण भागात व्हावा तसेच महाराष्ट्रासहित गोवा आणि कर्नाटक राज्यांतील दिग्गज खेळाडूंचा खेळ येथील क्रीड़ा रसिकांना पाहता यावा यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिक्रेट रसिकांना गेली २८ वर्षे दर्जेदार खेळ पहाण्याची पर्वणी या स्पर्धेच्या माध्यमातून मिळत आहे. क्रीडा, राजकीय आणि मनोरंजन क्षेत्राचा त्रिवेणी संगम व्हावा हा उद्देश या स्पर्धा आयोजन करताना समोर ठेवला जात आहे. या पर्यटन जिल्ह्यात विविध कलावंत यावेत तसेच त्यानी आपल्या कार्यक्षेत्रात मिळविलेल्या यशापासून प्रेरणा घेऊन येथील तरुणानी मार्गक्रमण करावे.हाही उद्देश आहे.असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलेश पवार यांनी केले. तुमचे प्रेम लक्षात राहील !तुम्हाला भेटून फार आनंद झाला. या स्पर्धेच्या निमित्ताने येथे उपस्थित राहण्याचा योग आला. त्याचबरोबर कणकवलीवासीयांचे प्रेम मिळाले. हे प्रेम माझ्या कायम लक्षात राहील.असे अभिनेता आकाश ठोसर याने यावेळी सांगितले. यावेळी आकाशने 'सैराट' चित्रपटातील संवाद सादर करून रसिकांची वाहवा मिळविली.कणकवली शहरात भव्य रॅली !'सैराट' चित्रपटातील ' परशा ' म्हणजेच अभिनेता आकाश ठोसर तसेच सिने दिग्दर्शक व अभिनेता महेश मांजरेकर आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कणकवली शहरातून क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वी भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत दुचाकीसह अनेक तरुण सहभागी झाले होते.यानिमित्ताने 'झिंगाट' गाण्याच्या तालावर कणकवलीतील युवाई सैराट झाल्याचे दिसून येत होती. या रॅलीची मुडेश्वर मैदानावर सांगता झाली. रॅलीदरम्यान 'परशा..परशा...' तसेच 'आर्ची आली रे ... ' म्हणत आकाश ठोसरचे कणकवलीकरांनी उत्साहात स्वागत केले.तर परशाची छबी आपल्या मोबाईल मध्ये टिपण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती.कणकवली शहरातून बाजारपेठ मित्र मंडळाच्या वतीने क्रिकेट स्पर्धेचे औचित्य साधून रविवारी रॅली काढण्यात आली. दुसऱ्या छायाचित्रात कणकवली मुडेश्वर मैदानावरील क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी सिने-अभिनेते महेश मांजरेकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी अभिनेता आकाश ठोसर, संदेश पारकर, आमदार वैभव नाईक आदी उपस्थित होते.