शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महायुतीचा पुन्हा गोंधळ

By admin | Updated: May 20, 2014 04:30 IST

भाजपा-शिवसेना युतीने सुनावणीत गोंधळ घालत सुनावणी पुन्हा बंद पाडली.

पुणे : शहराच्या जुन्या हद्दीच्या सुधारित विकास आराखड्यावरील (डीपी) सुनावणीत पारदर्शकता नसल्याने, तसेच ती नियोजनबद्ध पद्धतीने होत नसल्याचा आरोप करीत भाजपा-शिवसेना युतीने आज या सुनावणीत गोंधळ घालत सुनावणी पुन्हा बंद पाडली. दरम्यान, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या या गोंधळाचा फटका मात्र सुनावणीसाठी उपस्थित राहिलेल्या पुणेकरांना सहन करावा लागला. या आराखड्यावर घेण्यात आलेल्या हरकती-सूचनांवर ५ मेपासून सुनावणीला सुरुवात केली होती. मात्र, सुनावणीसाठी नागरिकांना वेळेत नोटिसा मिळाल्या नसल्याचा आरोप करीत शिवसेना-भाजपाने ही सुनावणी पहिल्याच दिवशी उधळून लावली. त्यानंतर १८ मेपर्र्यंत सुनावणी स्थगित केली होती. आज पुन्हा ही सुनावणी घेण्याचे नियोजन प्रशासनाने केले होते. त्यानुसार नागरिकांना नोटिसा देऊन सुनावणीसाठी अर्धा तास आधी उपस्थित राहण्यास सांगितले होते. सकाळी दहापासून ही प्रक्रिया सुरू होणार होती. मात्र, भाजपा-सेनेच्या पदाधिकारी आणि नगरसेवकांनी या सुनावणीला विरोध करीत महापालिका भवनासमोर धरणे आंदोलन केले. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास सुनावणी सुरू असलेल्या महापालिकेच्या वडके सभागृहात जाऊन नियोजन समितीच्या सदस्यांना घेराव घातला आणि सुनावणी बंद पाडली. या गोंधळामुळे सुनावणी दोनपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे समिती सदस्य अ‍ॅड. अभय छाजेड यांनी उपस्थित नागरिकांना सांगितले. त्यानंतरही मात्र भाजपचे आमदार गिरीश बापट, माजी नगरसेवक उज्ज्वल केसकर त्यांच्यासह पदाधिकार्‍यांनी पुन्हा ही सुनावणी रोखून धरली. तसेच, वडके सभागृहाबाहेरच ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर आंदोलनकर्ते आणि समिती सदस्यांमध्ये जवळपास दीड तास बैठक सुरू होती. तोपर्यंत सुनावणीसाठी आलेल्या नागरिकांना काहीही न सांगता बसवून ठेवण्यात आले. अखेर पाचच्या सुमारास या नागरिकांना आज सुनावणी होणार नसून उद्या (मंगळवारी) दुपारी ३ नंतर सुनावणीस उपस्थित राहण्यास सांगण्यात आले. त्यामुळे सुनावणीसाठी आलेले नागरिक चांगलेच संतप्त झाले होते. दरम्यान, या प्रकारानंतर भाजपाच्या पदाधिकार्‍यांनी या नागरिकांची माफी मागितली़ मात्र, सकाळपासून अन्न पाण्याविना राहावे लागल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.