शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

राज्यातील महावितरणची कार्यालये होणार 'पेपरलेस'

By admin | Updated: May 28, 2015 01:13 IST

जूनअखेर कार्यान्वित : कामे गतिमान होऊन पारदर्शकता वाढणार--- शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण कोल्हापूर परिमंडल.

शेखर धोंगडे - कोल्हापूरराज्यातील महावितरण कंपनीच्या १४ परिमंडल विभागांतील सर्व शाखा विभागापासून ते मुख्य कार्यालयापर्यंतचे विभाग हे आता पेपरलेस होणार आहेत. त्यामुळे कागद व फायलिंगचा ढिगारा कमी झाल्याचे चित्र जूनच्या अखेरपर्यंत पाहावयास मिळेल. राज्यभर पसरलेल्या ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नरत असलेलीे महावितरण कंपनी आता अंतर्गत विभागातही अधिक अचूक, पारदर्शक राहण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याचेच एक पाऊल म्हणून ई.आर.पी. (इंटरप्रायजेस रिसोर्स प्लॅनिंग) अंतर्गत प्रशासनाची सर्व कामे कागदाऐवजी संगणकाद्वारे केली जाणार आहेत. परिणामी, राज्यात विखुरलेल्या माहितीचे सनियंत्रण व सुव्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येणार आहे. पाच महिन्यांपासून सर्व विभागांमध्ये पेपरलेस आॅफिसची संकल्पना राबविण्याची मोहीम अंतिम टप्प्यात असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. यातून विश्वासार्हता, कामात गती व पारदर्शकता येण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर गैरकारभाराला देखील आळा बसेल, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.प्रशासकीय यंत्रणेच्या व्यवस्थापनातील ई.आर.पी. ही सुंदर पद्धत असून याच माध्यमातून दोन महिन्यापासून ठेकेदांराची बिलंही अदा केली आहेत. यातून पारदर्शकता व अचूकता वाढणार असून ७० टक्क्क्यांपेक्षा अधिक काम याचे पूर्ण झाले आहे. उर्वरित व्यवस्थापनाची माहिती संगणकावर घेण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. सर्वांचेच नियंत्रण यावर राहणार आहे.- शंकर शिंदे, मुख्य अभियंता, महावितरण कोल्हापूर परिमंडल.ई.आर.पी. अंतर्गत सारे काही संगणकावरचप्रशासकीय सेवेत राज्यस्तरावर काही मुख्य व मोठ्या शासकीय यंत्रणेत पेपरलेस व्यवस्था सुरू झाली असून, त्या यादीत आता लवकरच महावितरणचा विभागही जाईल. यामुळे राज्यातील माहितीचे सनियंत्रण व सुव्यवस्थापन प्रभावीपणे करता येईल. यामध्ये कर्मचाऱ्यांची बिलं काढणे, आॅनलाईन गोपनीय अहवाल सादर करणे, वित्तीय व्यवहार व त्यावर नियंत्रण ठेवणे, प्रकल्प व्यवस्था पाहणे, यंत्रसामग्री व्यवस्थापन, सयंत्र देखभाल व दुरुस्ती, इत्यादी मॉड्यूलचा या ई.आर.पी.त समावेश केला आहे.ठेकेदारांचीही बिलं आॅनलाईनच ठेकेदारांची बिलं देखील आॅनलाईनच काढली जाणार आहेत. यामुळे पारदर्शकतेबरोबरच चांगली ग्राहक सेवा देण्यासाठी कर्मचाऱ्यांना याचा अधिकतर खूप उपयोग होईल. यातून विश्वासार्हता वाढून कामांना गती येईल.राज्यातील कामाची संपूर्ण माहिती ‘एकाच क्लिक’वरबहुतांश कर्मचारी संगणकावर काम करत असल्याने मिळणार फायदा.चॅम्पियन नावाच्या स्वतंत्र यंत्रणेने कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले आहे.सुटी टाकणे, पगार बिलं देणे, अशीही कामे संगणकावर होतील.कागदांवरील खर्च, फायलींचा ढिगारा कमी होण्यास मदत मिळेल.कोल्हापूर जिल्ह्यातील ६ हजार अधिकारी, कर्मचारीवर्ग आता 'आॅन लाईन' वर अंतर्गत व्यवस्थापनाचे काम करणार.