शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणला ग्राहकमंचाचा झटका महावितरणची कारवाई बेकायदा असल्याचे मंचाचे निरीक्षण

By admin | Updated: May 10, 2014 20:38 IST

ग्राहकास नुकसानभरपाईसह आलेल्या खर्चापोटी १३ हजार रुपये सहा आठवड्यांत देण्याचा आदेश न्यायमंचाने महावितरणला दिला आहे.

पुणे : जागेच्या मालकीबाबत न्यायालयाऐवजी स्वत:च निर्णय घेऊन ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करणार्‍या महावितरणचे ग्राहक मंचाने फटकारले. महावितरणने वीजपुरवठा खंडीत केल्याची कारवाई बेकायदा असल्याचे निरीक्षण नोंदवत, याबद्दल ग्राहकास नुकसानभरपाईसह आलेल्या खर्चापोटी १३ हजार रुपये सहा आठवड्यांत देण्याचा आदेश न्यायमंचाने महावितरणला दिला आहे. तुकाराम पांडुरंग भुवड (रा. पूरग्रस्त वसाहत, पवर्ती) यांनी तक्रार दिली होती. भुवड हे ५० वर्षापासून पर्वती येथे वास्तव्यास असून मागील १५ वर्षांपासून महावितरणचे ग्राहक आहेत. परंतु, महावितरणने पूवर्सूचना न देता त्यांचा घरगुती वीजपुरवठा खंडित केली. याबाबत त्यांनी महावितरणच्या पद्मावती उपविभागाकडे ११ जानेवारी २०१३ रोजी अर्ज केला, तरी त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे दोन महिने वीजपुरवठा खंडित होता. परिणामी, त्यांच्या मुलांचा अभ्यास आणि पत्नीच्या आजारावरही दुष्परिणाम झाला. अखेर भुवड यांनी ग्राहक मंचात तक्रार दाखल केली. दुसरीकडे भुवड यांनी वीजपुरवठा खंडित केल्याची तक्रार मार्केट यार्ड विभागाकडे न देता पद्मावती विभागाकडे दिली आणि त्यांचा शशिधर किसन तापकीर यांच्याशी जागेच्या मालकीबाबत वाद आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित केल्याचे महावितरणने ग्राहक मंचात सांगितले. परंतु, जागेच्या वादाबाबत न्यायालयाच्या आदेशाशिवाय वीजपुरवठा खंडित करणे बेकायदा असल्याचे निरीक्षण ग्राहक मंचाचे अध्यक्ष व्ही. पी. उत्पात आणि सदस्या गीता घाटगे यांनी नोंदविले आहे. तसेच, भुवड यांना पद्मावती विभागाकडून वीजबिल येत असल्याने मार्केट यार्ड उपविभागात तक्रार करावयास हवी, हे महावितरणचे म्हणणे तथ्यहीन असल्याचे न्यायमंचाने निकालात नमूद केले आहे.त्यामुळे महावितरणने तक्रारदार यांना वीज पुरवठा खंडीत कल्यामुळे शाररिक, मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागले, त्याच्या नुकसानभरपाईसाठी १० हजार रूपये व तक्रारीच्या खर्चासाठी ३ रूपये देण्याचा आदेश मंचाने दिला.