शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींचा महावितरणवर मोर्चा

By admin | Updated: May 17, 2016 04:04 IST

पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर अद्यापही वीज पोहोचलेली नाही. ज्या ठिकाणी वीजजोडणी करण्यात आली आहे

कळंबोली : पनवेल तालुक्यातील आदिवासी वाड्यांवर अद्यापही वीज पोहोचलेली नाही. ज्या ठिकाणी वीजजोडणी करण्यात आली आहे, तिथे वारंवार वीजपुरवठा खंडित होणे, भरमसाट वीज बिल आदी समस्यांमुळे आदिवासी त्रस्त आहेत. याविरोधात सोमवारी श्रमजीवी संघटनेने महावितरणच्या भिंगारी कार्यालयावर मोर्चा काढून असंतोष व्यक्त केला. यावेळी संघटनेच्या वतीने महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात आदिवासी वाड्या - पाडे आहेत. बहुंताशी ठिकाणी आजही वीज पोहचली नसल्याने आदिवासी अंधारात चाचपडत आहेत. वारंवार मागणी करूनही त्यांना वीजजोडणी दिली जात नसल्याचा आरोप आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. ज्या वाड्यांमध्ये वीज पोहोचली आहे, तिथे वारंवार भारनियमन करण्यात येत असल्याने वीज असून नसल्यासारखी आहे. असे असले तरी त्यांना बिले मात्र वाढीव व भरमसाट पाठविले जात असल्याच्या अनेक तक्र ारी आहेत. वाढीव वीज बिल न भरल्यास, लागलीच वीज पुरवठा खंडित केला जात असल्याचेही आदिवासींचे म्हणणे आहे. मौजे निताळी येथील खानचा बंगला या कातकरी वाडीकरिता वीजपुरवठा योजना २०१४ मध्येच मंजुरी झाली आहे. मात्र अद्यापही या ठिकाणी वीज पोहचलेली नाही. या संदर्भात गेल्या वर्षी १९ फेब्रुवारी रोजी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी लवकरच काम सुरू करून ते पूर्ण करण्याचे आश्वासन महावितरणकडून देण्यात आले होते. हे आश्वासन हवेतच विरले असून अद्यापही वाडीवर दिवे लागले नाहीत. आदिवासी वाडीवर जर मीटर रिडिंग घेवून वीजबिल पाठवले जात असेल तर अवास्तव वीज बिल येते कसे, असा प्रश्न आदिवासींनी उपस्थित केला असून वाढीव बिल कमी न करता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याचे मोर्चेकऱ्यांचे म्हणणे आहे. जास्त बिल कमी करून त्यांना वीज बिल भरण्याकरिता मुदतद्यावी, नवीन मीटर बसविण्याकरिता कमी शुल्क आकारले जावे, अशी मागणी सोमवारी मोर्चेकऱ्यांनी केली. संघटनेचे जिल्हा सरचिटणीस संजय गुरव, तालुकाध्यक्ष भीमा गोसावी, तालुका संघटक जानू कातकरी, योगिता दुर्गे, कचरू कातकरी, बाया कातकरी यांच्याशी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी चर्चा केली. (वार्ताहर)