शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

सातासमुद्रापलीकडील परदेशीच महात्मा गांधींचे ‘फॉलोअर्स’

By admin | Updated: July 10, 2016 04:35 IST

महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले. मात्र, आजही पुस्तकातले धडे सोडले, तर देशातील तरुणपिढीला या महात्म्याबद्दल माहीत असणे कठीण आहे.

- स्नेहा मोरे, मुंबई

महात्मा गांधींनी स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान दिले. मात्र, आजही पुस्तकातले धडे सोडले, तर देशातील तरुणपिढीला या महात्म्याबद्दल माहीत असणे कठीण आहे. मात्र, आजही सातासमुद्रापलीकडील परदेशी नागरिक गांधींना समजण्याविषयी अधिक उत्सुक असल्याचे दिसून आले आहे. मुंबई सर्वोदय मंडळाच्या संकेतस्थळाला भेट देण्यात परदेशी नागरिक अग्रेसर आहेत.मुंबई सर्वोदय मंडळाच्या ँhttp://www.mkgandhi.org या संकेतस्थळावर गांधींविषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. गांधींचे विचार, साहित्यसंपदा, त्यांची भाषणे, जीवनप्रवास, संस्था अशी सर्व माहिती परिपूर्ण पद्धतीने देण्यात आली आहे. हे संकेतस्थळ गांधींना जाणून घेण्यासाठी विद्यार्थी, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते यांकरिता उत्तम माध्यम आहे. त्यामुळे दरसेंकदागणिक या संकेतस्थळाला देशभरातून तसेच सातासमुद्रापारहूनदेखील अनेक नागरिक भेट देत असतात. यात मे २०१६मध्ये अमेरिकेतून सर्वाधिक म्हणजे १ लाख ७८ हजार ११ व्यक्तींनी संकेतस्थळाला भेट दिल्याची नोंद आहे. दुसरे स्थान भारताने पटकाविले असून, १ लाख ५२ हजार २१९ देशवासीयांनी या संकेतस्थळाला भेट दिली. त्यानंतर, ग्रेटब्रिटनमधून ७ हजार ७०१, जर्मनीतून ५ हजार ६४९, स्पेनमधून ५ हजार नागरिकांनी संकेतस्थळाला भेट दिली आहे.जून २०१६मध्ये देशातील १ लाख ९३ हजार ९६८ व्यक्तींनी या संकेतस्थळाला भेट दिली. त्यानंतर, दुसऱ्या स्थानी अमेरिकेतील १ लाख ८० हजार ११५ व्यक्तींनी या संकेतस्थळाला भेट दिल्याची नोंद आहे. त्यानंतर, जर्मनी ९ हजार २५४, ग्रेटब्रिटनमधून ५ हजार ८७४ आणि चीनमधून ४ हजार ३८४ नागरिकांनी या संकेतस्थळाला भेट दिली आहे. साहित्य संपदाही ‘हिट’मुंबई सर्वोदय मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या साहित्यसंपदेलाही सर्वाधिक पसंती मिळत आहे. यात जून महिन्यात एकूण २९७ आणि मे महिन्यात २९५ पुस्तके डाउनलोड करण्यात आली. त्यात ‘टॉप’ पुस्तकांमध्ये ‘सत्याचे प्रयोग’, ‘इन्सेस आॅफ हिंदुइझम’, ‘हिंद स्वराज’, ‘गांधी रिलेव्हन्स’, ‘स्टोरी आॅफ माय लाइफ’, ‘माइंड आॅफ महात्मा गांधी’, ‘गांधीजी आॅन खादी’, ‘गांधी बायोग्राफी फॉर बिगिनर्स’ अशा पुस्तकांचा समावेश आहे.३० सेकंदांना १,९२,३१४व्हिजिटर्समहात्मा गांधींविषयी जाणून घेण्यासाठी जगभरातून या संकेतस्थळाला नागरिक भेट देतात. त्यात ३० सेकंदांना १ लाख ९२ हजार ३१४ व्यक्तींनी जून महिन्यात भेट दिली, तर मे महिन्यात ३० सेकंदांना हेच प्रमाण १ लाख ८३ हजार ९८९ एवढे होते.(आकडेवारी - २०१६)महिनेव्हिझिटर्सची संख्याजानेवारी२ लाख ७६ हजार ५८२फेब्रुवारी२ लाख २८ हजार १७६मार्च २ लाख ९ हजार ८५७एप्रिल २ लाख ९ हजार २१८मे २ लाख १९ हजार ४५७जून २ लाख २९ हजार ६२६