शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राच्या वारकरी शिक्षण संस्थेने गाठली शंभरी!

By admin | Updated: March 19, 2017 02:16 IST

शताब्दी सोहळा: आळंदीकडे भाविकांची ओढ

ब्रह्मनंद जाधवबुलडाणा, दि. १८- श्रीक्षेत्र आळंदी येथे जोग महाराज यांच्याद्वारे संस्थापित महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त वारकरी सांप्रदायाच्यावतीने २२ ते २९ मार्च रोजी होणार्‍या शताब्दी सोहळ्यासाठी आळंदीला राज्याच्या कानाकोपर्‍यातून भाविकांचा ओढा वाढणार असून, समाजप्रबोधनाचे कार्य करणारे राज्यभरातील कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक मंडळी या सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती मूळचे बुलडाणा जिल्हय़ातील असणारे महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश महाराज जंवजाळ यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना दिली. महाराष्ट्रातील संतांचे विचार समाजात रुजविण्यासाठी तसेच कीर्तन, प्रवचन, गायक व वादक घडविण्यासाठी संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या वास्तव्याने पावन झालेल्या श्रीक्षेत्र आळंदी येथे जोग महाराज यांनी महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. समाजाकडून संचालित, सक्रिय अनौपचारिक संत साहित्याची शिकवण देणारी संस्था म्हणजे वारकरी शिक्षण संस्था. महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेला १00 वर्ष पूर्ण झाले आहेत. यादरम्यान या वारकरी शिक्षण संस्थेने महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागाला कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व वारकरी मंडळी तयार करून दिले. महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेचा शताब्दी महोत्सव श्रीक्षेत्र आळंदी येथे २२ ते २९ मार्चला आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रातील पहिली वारकरी शिक्षण संस्थाविष्णुबुवा जोग महाराज यांनी मारुतीबुवा गुरव आणि मारुतीबुवा ठोंबरे यांच्या आग्रहावरून चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा शके १८३९ म्हणजेच २४ मार्च १९१७ रोजी आळंदी देवाची येथील विठ्ठल मंदिराच्या महाद्वाराजवळ या वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना केली. इ.स. १९१७ ते १९२0 या काळात विष्णुबुवा जोग हे या संस्थेचे अध्यक्ष होते. ही संस्था महाराष्ट्रातील पहिली वारकरी संस्था आहे. या संस्थेने आतापर्यंत हजारो कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक व वारकरी मंडळी घडविली. तसेच महाराष्ट्रातील खेडोपाडी शुद्ध वारकरी परंपरेचे भजन सुरू केले. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात कीर्तनकार, प्रवचनकार, गायक , वादक व वारकरी मंडळी घडविण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य वारकरी शिक्षण संस्थेकडून गेल्या १00 वर्षांंपासून होत आहे. त्यानिमित्त आयोजित शताब्दी महोत्सवाला श्रीक्षेत्र आळंदी येथे वारकरी तसेच वारकरी सांप्रदायाप्रती जिव्हाळा असलेल्या सर्व भाविकांनी उपस्थित रहावे. - प्रकाश महाराज जवंजाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळ.