शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

राजपथावर महाराष्ट्राची ‘वारी’

By admin | Updated: January 23, 2015 01:21 IST

महाराष्ट्राचा ‘पंढरीची वारी’या संकल्पनेवरील चित्ररथ यंदाच्या राजपथावरील प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे.

दिल्लीत घडणार दर्शन : १५ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २५ चित्ररथ नवी दिल्ली : महाराष्ट्राचा ‘पंढरीची वारी’या संकल्पनेवरील चित्ररथ यंदाच्या राजपथावरील प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी सज्ज झाला आहे. सहभागी होणाऱ्या कलाकारांनी सराव केला असून, चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे. महाराष्ट्रासह १५ राज्यांचे आणि ९ मंत्रालयांचे असे २५ चित्ररथ सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाकडून सांगण्यात आले. प्रजासत्ताक दिली राष्ट्रपती, पंतप्रधान आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्र मात देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. ‘पंढरीची वारी’ या चित्ररथाच्या माध्यमातून देशवासियांना महाराष्ट्राचे दैवत व तमाम वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या पांडुरंगांच्या भेटीला राज्यातील व राज्याबाहेरील विविध भागातून पायी येणारे वारकरी आणि त्यातून होणारे सामाजिक व सांस्कृतिक दर्शन होणार आहे. चित्ररथाचे संकल्पनाचित्र कला दिग्दर्शक चंद्रशेखर मोरे यांचे असून, एकूण ६५ कारागिरांनीत्याची निर्मिती केली आहे. चित्ररथाच्या प्रारंभी डोक्यावर तुळस घेतलेली स्त्री असून, मध्यभागी पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई मंदिर आहे. अश्वांचे रिंगण चित्ररथावर असून, शेवटच्या भागात संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज महाराजांच्या मूर्ती बसविण्यात आल्या आहेत. (विशेष प्रतिनिधी)च्या चित्ररथावर विठ्ठल विठ्ठल तुला साद आली तुझ्या लेकारांची अलंकापुरी आज भारवली, वसा वारीचा घेतला पावलांनी आम्हा वाळवंटी तुझी सावली’ यागीतावर टाळ, मृंदग, वीणेच्या गजरात वारकरीवातावरण भारावून टाकणार आहेत. च्चित्ररथाच्या दोन्ही बाजूला पालखी, पतका, टाळ, मृदंग, वीणेसह वारीत सहभागी १३० वारकऱ्यांच्या प्रतिकृती बनविण्यात आल्या आहेत.