शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची - तावडे

By admin | Updated: November 4, 2015 03:20 IST

केंद्र शासनामार्फत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात येणार आहे, त्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. या राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक

मुंबई : केंद्र शासनामार्फत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात येणार आहे, त्यामध्ये महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. या राज्यस्तरीय शैक्षणिक परिषदेच्या माध्यमातून नवीन शैक्षणिक धोरण तयार करण्यासाठी शिक्षण तज्ज्ञांकडून महत्त्वपूर्ण अभिप्राय प्राप्त होतील, अशी अपेक्षा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली.उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने ‘नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावर सिडनहॅम महाविद्यालय येथे राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी तावडे बोलत होते. ते म्हणाले की, देशाचे नवीन शैक्षणिक धोरण ठरविताना यंदा प्रथमच तळागाळापासून शिक्षणाचा विचार करण्यात आला आहे. फक्त उच्च व तंत्र शिक्षणच नव्हे, तर शालेय शिक्षणाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे हे नवीन धोरण शैक्षणिक गुणवत्तेच्या दृष्टीने आणि पुढील युवा पिढीसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल.शालेय शिक्षण विभागाचे धोरण ठरविताना राज्यभरातून तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय पातळीवर कार्यशाळा, सादरीकरण आदी उपक्रम राबवून केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाबाबत सुचविलेल्या १८ प्रश्नांच्या आधारे माहिती जमा करण्यात आली आहे. हा अभिप्राय देशभरासाठी उपयोगी ठरणार आहे. नवीन शैक्षणिक धोरण तयार करताना शैक्षणिक पात्रता व व्यावसायिक पात्रता धारण करणारे शिक्षक असा वेगळा विचार करण्याची गरज आहे. या नवीन शैक्षणिक धोरणात कौशल्य विकासावरही भर देण्याबाबतचा विचार अपेक्षित आहे. याचा महाराष्ट्राचा नवीन विद्यापीठ कायदा यासाठीही उपयोग होणार आहे. सर्वंकष असे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण तयार करण्यात येणार असून, या परिषदेच्या माध्यमातून केंद्राला महत्त्वपूर्ण अभिप्राय देण्यासाठी सर्व शिक्षणतज्ज्ञांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन तावडे यांनी केले. (प्रतिनिधी)