शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कृष्णेच्या पाण्यावर महाराष्ट्राचाच हक्क

By admin | Updated: January 11, 2017 04:44 IST

कृष्णा नदीच्या पाणीवाटपाचे नव्याने वाटप करून महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी मिळावे

सांगली : कृष्णा नदीच्या पाणीवाटपाचे नव्याने वाटप करून महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी मिळावे, अशी याचिका तेलंगणा सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. सोमवारी ही याचिका फेटाळत महाराष्ट्राच्या वाट्याला येणारे ६६६ टीएमसी (दशलक्ष घनफूट) पाणी कायम ठेवण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे. मूळ आंध्र प्रदेशच्या वाट्याला आलेल्या पाण्यातूनच आंध्र आणि तेलंगणा राज्याला पाण्याचे वाटप करण्याचा निर्णयही न्यायालयाने दिला.आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन आंध्र आणि तेलंगणा अशा दोन राज्यांची निर्मिती झाली आहे. त्यानंतर पुन्हा कृष्णा नदीतील पाणी वाटपाचा प्रश्न निर्माण झाला होता. तेलंगणा सरकारने महाराष्ट्राच्या वाट्यातील ६६६ टीएमसी पाण्यातून पाणी मिळावे, अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केली होती. या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती मदन लोकूर व प्रफुल्ल पंत यांच्या संयुक्त खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी महाराष्ट्र सरकारच्यावतीने अ‍ॅड. दीपक नारगोलकर यांनी बाजू मांडली.तेलंगणा व आंध्रप्रदेशच्या पाणीतंट्यात महाराष्ट्रासह कर्नाटकलाही ओढण्यात आले होते. आंध्र प्रदेशच्या फेररचनेनंतर २०१४ मध्ये आंध्र प्रदेश फेररचना कायदा अस्तित्वात आला आहे. तेलंगणाच्या निर्मितीनंतर पाणीवाटपाचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावेळी एकत्रित आंध्र प्रदेशच्या वाट्याला आलेले १००५ टीएमसी पाणी दोन्ही राज्यांनी परस्परांमध्ये वाटून घ्यावे, असे राष्ट्रीय पाणीलवादाने स्पष्ट केले होते. तरीही तेलंगणा आणि आंध्रप्रदेशने महाराष्ट्राच्या वाट्याचे पाणी मिळावे, यासाठी लवादाकडे धाव घेतली होती. गतवर्षी आॅक्टोबरमध्ये लवादाचे राष्ट्रीय अध्यक्ष न्यायमूर्ती ब्रिजेश कुमार आणि सदस्य न्या. बी. पी. दास, न्या. राम मोहन रेड्डी यांनी दोन्ही राज्यांची मागणी फेटाळली होती. त्यानंतर या निर्णयाला तेलंगणाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. (प्रतिनिधी) पाण्याचे फेरवाटप करण्यास नकार तेलंगणा, महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांनी स्वतंत्रपणे युक्तिवाद केला. कलम ८९ च्या आंध्र प्रदेश राज्य निर्मिती कायदा २०१४ नुसार पाणी वाटपाचा दाखला देत खंडपीठाने महाराष्ट्र व कर्नाटकच्या पाण्याचे फेरवाटप करण्यास नकार दिला. तसेच तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांनी एकत्रित आंध्रच्या वाट्याचे १००५ टीएमसी पाणी आपसात वाटून घेण्याचे आदेशही न्यायालयाने दिले.