शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

महाराष्ट्राज मोस्ट स्टायलिश..!

By admin | Updated: February 1, 2017 06:02 IST

राजकारण, प्रशासन आणि समाजकारण यासह उद्योग, व्यापार क्षेत्रातील दिग्ग्ज मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी जुहूच्या जे. डब्लू मॅरियट या आलिशान हॉटेलात पार पडलेल्या

लोकमतच्या सोहळ्यात स्टाईलचा जलवा : एक अविस्मरणीय फॅशनेबल संध्याकाळमुंबई : राजकारण, प्रशासन आणि समाजकारण यासह उद्योग, व्यापार क्षेत्रातील दिग्ग्ज मान्यवरांच्या उपस्थितीत मंगळवारी जुहूच्या जे. डब्लू मॅरियट या आलिशान हॉटेलात पार पडलेल्या लोकमत महाराष्ट्र मोस्ट स्टायलिश अ‍ॅवॉर्ड सोहळ्याला मराठी आणि हिंदी तारे-तारकांनी गाजवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या शानदार समारंभात विविध क्षेत्रांमधील मोस्ट स्टायलिश सेलिब्रिटीजना अ‍ॅवॉर्ड देण्यात आले. कॉटनकिंग प्रस्तुत लोकमत महाराष्ट्राज स्टायलिश अ‍ॅवॉर्डचा हा सोहळा सुरू झाला आम्ही महाराष्ट्रीयन या खास लोकमत गीताने. प्रख्यात कोरिओग्राफर फुलवा खामकर यांनी सादर केलेल्या गणेश वंदनेनंतर रंगत गेलेल्या या समारंभात अधिकाधिक रंग भरले, ते सेलिब्रिटिजच्या मुलाखती आणि त्यांनी सांगितलेल्या अविस्मरणीय आठवणींमुळे. या सोहळ्याचे प्रोग्रेस पार्टनर होते भारत विकास ग्रुप.हृतिक रोशन, सोनम कपूर, टायगर श्रॉफ, ऋषिकपूर, जितेंद्र, राकेश रोशन, गुलशन ग्रोव्हर, महेश कोठारे, आशुतोष गोवारीकर, महेश मांजरेकर, स्वप्निल जोशी, सई ताम्हनकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, सोनाली बेंद्रे, राधिका आपटे, साजिद नडियादवाला हे हिंदी व मराठीतील आघाडीचे कलाकार, राजकारणातील युवा स्टायलिश नेता आदित्य ठाकरे, गायिका शाल्मली खोलगडे व प्रियांका बर्वे, यंग आणि डायनॅमिक आणि अल्पावधीतच लोकप्रियता मिळवणारा अजिंक्य रहाणे, प्रख्यात छायाचित्रकार अतुल कसबेकर, आरजे मलिष्का हे सारे जसजसे येत गेले, तसतसा समारंभ रंगू लागला. अभय जोशी, नितीन खरा, अभिषेक तापडिया,अरुण लखाणी, नितीन जाधव यांचे आगमनही वैशिष्ट्यपूर्ण होते.त्यांच्या सोबतीला उद्योजक गौतम सिंघानिया, सज्जन जिंदल, संगीता जिंदल, कॉटनकिंगचे मालक कौशिक मराठे, भारत विकास ग्रुपचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हनमंत गायकवाड, डायमंडकिंग मावजीभाई पटेल, यूएसके फाउंडेशनच्या उषा काकडे, अजिंक्य डी. वाय. पाटील हे मान्यवर आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पर्यटनमंत्री जयकुमार रावल, अमरसिंग, नितीन सरदेसाई हे राजकीय नेते... सोबतच एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, आयआरबीचे जयंत म्हैसकर, योगश लखानी, जिंदा शहीद म्हणून परिचित असलेले मनिंदरजीत सिंह बिट्टा या मंडळींच्या येण्याने अ‍ॅवॉर्ड सोडळ्यात जिवंतपणा आणला. विविध क्षेत्रांतील, पण महाराष्ट्रात आल्यानंतर या राज्याचे झालेले हे सारे महाराष्ट्रीयनच. प्रत्येकाची स्टाईल वेगळी, वैशिष्ट्यपूर्ण. त्यांच्यापैकी अनेकांचे आगमनही स्टायलिशच होते. त्यांच्यातील ३१ जणांना लोकमतने महाराष्ट्राज स्टायलिश अ‍ॅवार्डने गौरविले. अमृता फडणवीस याही त्यांच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे ओळखल्या जातात. त्यामुळे त्याही विजेत्या होत्या. पण त्यांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अ‍ॅवार्ड स्वीकारला. प्रख्यात चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते महेश कोठारे यांना स्टायलिश जीवनगौरव अ‍ॅवॉर्ड देण्यात आला, तेव्हा मला आयुष्यात आणखी खूप काही करायचे आहे, असे ते गंमतीने म्हणाले.आदित्य ठाकरे यांना अ‍ॅर्वार्ड दिल्यानंतर त्यांची जी छोटेखानी मुलाखत ऋषि दर्डा यांनी घेतली. त्यात त्याने स्टाईलविषयीच्या आपल्या कल्पना सांगितल्या आणि या आगळ्या अ‍ॅवॉर्डबद्दल लोकमतचे कौतुकही केले. ज्येष्ठ अभिनेते महेश मांजरेकर यांनी अभिनेत्री सई ताम्हणकर आणि अमृता खानविलकर यांना त्यांच्या स्टाइलविषयी बोलते केले. क्रिकेटव्यतिरिक्त हा माझा पहिला अ‍ॅवॉर्ड आहे, असे अजिंक्य रहाणे म्हणाला. या अ‍ॅर्वार्डमुळे मला स्टायलिश राहावे लागेल, असेही तो हसतच म्हणाला. सुयश टिळक व क्रांती रेडकर यांनी या रंगतदार सोहळ्याचे सूत्रसंचालन केले.- लोकमत समूहाच्या एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन विजय दर्डा यांनी छोटेखानी मनोगत व्यक्त करताना, दिग्गजांच्या उपस्थितीबद्दल त्या सर्वांचे आभार मानले. लोकमतवरील प्रेमापोटीच तुम्ही आला आहात, असे ते म्हणाले. लोकमत हे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे, तर या देशातील सर्वाधिक खपाचे दैनिक आहे. हे केवळ वृत्तपत्र नसून, जनतेचा आवाज आहे. सखी मंचने महिलांसाठी केलेल्या कामाचाही उल्लेख त्यांनी आवर्जून केला. लोकमतने लहान मुले, तरुणांसाठीही व्यासपीठ निर्माण केले आहे आणि विदर्भात यावर्षी राज्य सरकारच्या सहकार्याने वर्ल्ड आॅरेंज फेस्टिवल आयोजित करण्यात येणार आहे, असेही विजय दर्डा म्हणाले.